जपानी पडले भारतीयांच्या प्रेमात; बिहारी कलाकार रंगवाणार जपानची रेल्वे
ही रेल्वेगाडी 22 डब्यांची आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने रंगविण्यात आलेल्या या कलाकृतीचे विदेशी पर्यटकांकडूनही जोरदार कौतुक होत आहे.
Japanese request to Indian Railways: जगाला बुलेट ट्रेन (Bullet train) पुरवणारा जपान (Japan) आता भारतिय कलाकारांच्या प्रेमात पडला आहे. लवकरच जपानची रेल्वे (Japanese Rail) बिहारी कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींनी सजलेली दिसेल. बिहारी कलाकारांच्या कलाकारीचा आनंद जपानी लोकांना रेल्वेप्रवासात क्षणाक्षणाला पाहायला मिळेल. भारतीय रेल्वेगाड्यांवर (Indian Railway) साकारलेली एकापेक्षा एक सुंदर कलाकृती पाहून जपान सरकारही मोहीत झाले. जपानने भारताशी संपर्क साधून आपल्या रेल्वेगाड्यांवरही अशी कलासुसर करावी अशी मागणी केली. त्यानंतर भारत सरकारनेही कलाकारांची एक स्वतंत्र टीम तयार करुन जपानला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय रेल्वेची दिल्ली ते दरभंगा असा प्रवास करणाऱ्या क्रांती एक्सप्रेसचे 22 डबे मिथला पेंटींग्जने (Mithila Painting) सजले आहेत. भारतीय रेल्वेच्या या रुपाची दखल घेत यूएनओनेही घेतली आहे. तर, जपान सरकारने ही पेंटींग्ज पाहून जपानच्या रेल्वे गाड्यांवरही अशाच पद्धतीची पेंटींग्ज बनविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी भारतीय रेल्वेशीही संपर्क साधला आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वेकडून मधुबनी रेल्वे स्टेशनच्या भींतीही मिथीला पेंटिंग्जने अशाच सजविण्यात आल्या आहेत. आता समस्तीपूर रेल्वे स्टेशन्सच्या भींतीही अशाच पद्धतीने रंगविण्यात येणार आहेत. (हेही वाचा, मुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस !)
बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेस रेल्वेगाडी मिथीला पेंटींग्जने सजवण्यासाठी सुमारे 50 महिला कलाकारांना सुमारे 2.5 महिन्यांचा कालावधी लागला. ही रेल्वेगाडी 22 डब्यांची आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने रंगविण्यात आलेल्या या कलाकृतीचे विदेशी पर्यटकांकडूनही जोरदार कौतुक होत आहे.