शबाना आजमी यांची प्रकृती स्थिर, वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू; 18 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना काल कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की करत केलेल्या अटकेमुळे महाराष्ट्र- कर्नाटक वादाची ठिणगी अजूनच पेटली आहे. यातच भर म्ह्णून आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील पोलिसांना आव्हान करत कर्नाटकात जाणार आहेत.

19 Jan, 04:52 (IST)

 

शबाना आजमी यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जखमी झाल्या होत्या. त्यांना कळंबोली येथील महात्मा गांधी रुग्णालयात (एमजीएम) उपचार सुरू होते. मात्र, आत त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

19 Jan, 04:34 (IST)

सन 2020 या वर्षाच्या हज यात्रेसाठी संगणकीय सोडत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते नुकतीच पार पडली. केंद्रीय हज समितीच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात राज्यातील 10 हजार 408 जणांची हज यात्रेसाठी झाली निवड झाली.

ट्विट

19 Jan, 04:06 (IST)

नाईट लाईफ अर्थात हॉटेल्स, पब चोवीस तास सुरु ठेवण्याचा निर्णय सध्या तरी मुंबई शहरापुरताच आहे. मात्र, तसा प्रस्ताव आल्यास पुणे शहातही हॉटेल्स, पब रात्रभर सुरु ठेवण्यावर विचार करण्यात येईल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

19 Jan, 04:03 (IST)

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना गुजरात पोलीसांनी अटक केली आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील वीरमगाम येथे त्यांना अटक करण्यात आली. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली आजच त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर काही तासांमध्येच त्यांना अटक करण्यात आली आहे.

एएनआय ट्विट

19 Jan, 03:52 (IST)

नागरिकत्व संशोधन कायदा (CAA)  संसदेत मंजूर करण्यात आल्याने तो सर्व राज्यांना लागू करावाच लागेल. तसे करणे बंधनकारक आहे. कोणतेही राज्य हा कायता लागू करणार नाही, असे बोलता येऊ शकत नाही, असे भूवया उंचावणारे आणि तितकेच महत्त्वपूर्ण विधान ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी केले आहे.

एएनआय ट्विट

पीटीआय ट्विट

19 Jan, 03:48 (IST)

 

वनविभाग आणि संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी साहेबराव वाघाला भूल देऊन कृत्रिम पाय बसवला. परंतू, अर्थवट शुद्धीवर येताच साहेबरावने पाय आपटून कृत्रीम पाय काढून टाकला. त्यामुळे हा प्रयोग अयशस्वी ठरल्याची माहिती डॉ. सुश्रृत बाभुळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पीटीआय ट्विट

19 Jan, 03:33 (IST)

अभिनेत्री शबाना आजमी यांच्या कारला आज सायंकाळी अपघात झाला. मुंबई पुणे महारार्गावर खालापूर टोलनाक्यानजिक झालेल्या या अपघातात आजमी जखमी झाल्या. त्यांच्या अपघाताचे वृत्त समजतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दुख: व्यक्त केले तसेच, त्यांना लवकरच बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान मोदी ट्विट

19 Jan, 03:29 (IST)

शिर्डी वरुद्ध पाथर्डी असा वाद अधिकच धुमसू लागला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आज मध्यरात्री 12 वाजलेपासून अनिश्चित काळासाठी शिर्डी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बंद असला तरी साईबाबा मंदिर आणि प्रसादालय सुरु राहणार आहे.

19 Jan, 03:12 (IST)

 

मॅरेथॉन स्पर्धेमुळे बेस्ट बस वाहतूकीवरही परिणाम होणार आहे. बेस्ट बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही बस अन्य मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी 3.30  वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक 105,106, 108, 112, 123, 125, 132, 133, 136 आणि 155 हे काही काळासाठी (तात्पुरते) रद्द करण्यात आले आहेत. यासोबतच मॅरेथॉन स्पर्धा असलेल्या रस्त्यांवरील बसचौक्याही दुपारी 3.30 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.  त्यामुळे भेंडी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा, नेव्हीनगरकडे असे असणारे बसमार्ग हे सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाडीबंदर, पी. डीमेलो रोड आणि शहीद भगतसिंग या मार्गे राहतील.

19 Jan, 02:49 (IST)
  • दक्षिण, मध्य मुंबईमध्ये येणारे सुमारे 71 मार्ग रविवारी पहाटे पाच ते दुपारी 2 या काळासाठी बंद असणार आहेत.
  • 28 प्रमुख रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रबंद
  • मुंबईतील सर्व सार्वजनिक, स:शुल्क वाहनतळांचा वापर करता येणार.
  •  दक्षिण, मध्य मुंबईतील बेस्ट आगारांमध्येही वाहने उभी करण्यास मान्यता.
19 Jan, 01:56 (IST)

आरोग्य आणि सामाजिक जागृतीचा संदेश घेऊन मुंबईकर रस्त्यांवरुन धावण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या (रविवार, 19 जानेवारी 2020)  पहाटे तीन वाजलेपासून ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धा सुरु होत आहे. त्यासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मॅरेथॉन स्पर्धेचा सर्वासामान्य नागरिक आणि मुंबईकर यांना कोणताही अडथळा येऊ नये. वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा ताण पडू नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकच्या  अतिरिक्त रेल्वेगाड्याही सोडण्यात येणार आहेत.

 

19 Jan, 01:23 (IST)

बाबरी मशीद पाडल्यानंतर अनेकांनी जबाबदारी झटकली. पण, बाळासाहेबांनी ती स्वीकारली. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट अशी बाळासाहेबांची प्रतिमा देशभर निर्माण झाली. त्यानंतर लागलेला लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये आपले उमेदवार उभे केले. परंतू, त्या वेळी भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा बाळासाहेबांना फोन आला आणि त्यांनी विनंती केली. बाळासाहेब हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचंड हळवे होते. त्यांनी पक्षाला आदेश दिले उत्तर प्रदेशमधील उमेदवार मागे घ्या. त्यांनी आदेश दिले नसते तर उत्तर प्रदेशमधून  20 ते 25 खासदार तेव्हाच निवडूण आले असते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी बेळगाव येथील मुलाखतीदरम्यान केला.

19 Jan, 01:10 (IST)

या देशातील मुस्लिम हे भारताचे नागरिक आहेत. त्यांच्याही काही समस्या आहेत. मुंबईमध्ये मुस्लिम नागरिक रस्त्यावर नमाज पडायचे. युतीचे सरकार आल्यावर याबाबत चर्चा केली असता त्यांना नामाजसाठी जागाच नसल्याचे ते रस्त्यावर नमाज पडत असत. बाळासाहेबांकडे त्यांनी मशिदींचा एपएसआय वाढवून देण्याची विनंती केली. ती आमलातही आणली गेली. मुंबईच्या रस्त्यांवरचा नमाजच बंद झाला, असे संजय राऊत यांनी बेळगाव येथील मुलाखतीत म्हटले. 

19 Jan, 01:03 (IST)

कोणत्याही देशाचे सरकार हे धर्माच्या नावावर चालता कामा नये. आफल्या देशाचे सरकारही धर्माच्या नावावर चालले तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. कोणतंही सरकार हे लोकांच्या प्रश्नावर चालायला हवं. पोटाला जात नसते हा तर बाळासाहेब ठाकरे यांचाच विचार आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले.

19 Jan, 24:50 (IST)

केवळ शिवसैनिक आहे म्हणून मला अनेक वृत्तपत्रांनी मला नाकारले. बाळासाहेबांनी माझ्या अनेक चुका पोटात घेतल्या. बाळासाहेबांना काय हवं हे मला पटकण ध्यानात यायचं. त्यांच्या विचारांचा, व्यक्तिमत्वाचा माझ्या लिखाणावर प्रचंड परिणाम झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

19 Jan, 24:49 (IST)

केवळ शिवसैनिक आहे म्हणून मला अनेक वृत्तपत्रांनी मला नाकारले. बाळासाहेबांनी माझ्या अनेक चुका पोटात घेतल्या. बाळासाहेबांना काय हवं हे मला पटकण ध्यानात यायचं. त्यांच्या विचारांचा, व्यक्तिमत्वाचा माझ्या लिखाणावर प्रचंड परिणाम झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

19 Jan, 24:34 (IST)

महाराष्ट्र - कर्नाटक वाद म्हणजे कौरव-पांडवांच युद्ध नव्हे. सीमावाद हा न्यायालयात प्रलंबीत आहे. न्यायालयाच्या माध्यमातूनच तो सुटावा. शेवटी जमनी काय येते जाते. शेवटी त्यावर स्मशान आणि कब्रस्थानच बांधले जाते. पण, समाजा.. समाजातील स्नेह कायम राहिला पाहिजे, अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केलीआहे.

19 Jan, 24:27 (IST)

भाषांमध्ये वाद असू नये. कानडी माध्यमांच्या भाषांना महाराष्ट्रात आम्ही अनुदान देतो. मदत करतो. कन्नडीगांची भाषा, संस्कृती महाराष्ट्रातही टिकावी हा त्यामागे हेतू असतो. मराठी साहित्यामध्ये कन्नड साहित्यिकांचेही मोठे योगदान आहे. गिरिष कर्नाड, भिमसेन जोशी यांसारखे अनेक लोक त्यात आहेत.  त्याचे आम्हाला कौतुक आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी कन्नडीगांना टोला लगावला.

19 Jan, 24:22 (IST)

बेळगाव येथे संजय राऊत यांच्या प्रकट मुलाखतीस सुरुवात झाली आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या तमाम मराठी बांधवांचे कौतुक करत आणि आभार मानत संजय राऊत यांनी मुलाखत देण्यास सुरुवात केली आहे.

18 Jan, 23:48 (IST)

शिवसेना खासदार संजय राऊत हे बेळगाव येथील कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. काही वेळातच त्यांच्या प्रकट मुलाखती सुरुवात होणार आहे. या मुलाखतीपूर्वी व्यासपीठावर संजय राऊत दाखल झाले आहेत. दीपप्रज्वलन करुन या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. जेष्ठ पत्रकार नरेंद्र कोटेकर हे संजय राऊत यांची मुलाखत घेत आहेत.

Read more


सीमा लढ्यातील शहिद हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव (Belgaon) येथील हुतात्मा चौकात गेलेल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना काल 17  जानेवारी रोजी कर्नाटक पोलिसांनी (Karnatak Police)  अटक केल्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक वादाची ठिणगी अजूनच पेटली आहे. यातच भर म्ह्णून आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील पोलिसांना आव्हान करत कर्नाटकात जाणार आहेत. "हिंमत असेल तर मला कायद्याने अडवून दाखवा" असे आव्हान राऊत यांनी दिले असून आज दुपारी 2 वाजता ते कर्नाटक मध्ये दाखल होणार आहेत.

सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी 17 जानेवारी रोजी बेळगावच्या हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. मात्र यंदा या दिवशी कोणत्याही राजकीय व्यक्तींना बेळगावात येणयापासून मज्जाव करण्यात आला होता, असे असूनही काल राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे शुक्रवारी मध्यरात्रीच बेळगावात दाखल झाले होते. कोणताही सरकारी फौजफाटा न घेता गेल्याने ते सुरवातीला कोणाच्या नजरेत आले नाहीत.मात्र हुतात्मा चौकात अभिवादन करण्यासाठी पोहचताच पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की करत अटक केली. याच्या विरुद्ध आज यड्रावकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही संवाद साधणार आहेत

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान, राजकीय वातवरण जरी पेटले असले तरी राज्यात तापमानाचा पारा काही दिवसांपासून वर जाण्याचे नाव घेत नाहीये. महाराष्ट्र सह देशभरात थंडीची लाट पसरली असून आज सकाळी मुंबई मध्ये 20 , नाशिक आणि निफाड मध्ये 5 डिग्री दिल्ली मध्ये 11 डिग्री आणि उत्तर प्रदेश मध्ये 13 डिग्री वर तापमान उतरले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement