मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात,4 ठार 24 जण जखमी ; 14 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

रुग्णालय चालविण्यासाठी सरकार कडून देण्यात येणारी रक्कम न मिळाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या संदर्भात अनेक राजकीय पक्ष पुढे सरसावरले असून हे रुग्णालय बंद होऊ नये यासाठी मनसे पक्ष आग्रही आहे. त्याच संदर्भात आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे

15 Jan, 04:43 (IST)

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर  मनोर जवळील चिल्हार फाटाजवळ ट्रक आणि बसच्या झालेल्या अपघातात 4  जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 24 जण जखमी झाले असून त्यातील 3 जण गंभीर जखमी आहेत. 

15 Jan, 04:03 (IST)

पुणे येथील कोंढवा परिसरात मुस्लिम महिलांनी नागरिकत्व सुधारणा कायदा,NRC आणि NPR च्या विरुद्ध कँडल मार्च काढला होता.

ANI ट्विट 

15 Jan, 03:55 (IST)

मुंबईतील प्रसिद्ध वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेऊन मध्यस्थी करत हा प्रश्न मार्गी लावला त्यामुळे हे रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार असल्याची,ग्वाही ठाकरे यांनी दिली. तसेच या रुग्णलयासाठी आवश्यक तो निधी उभारण्याचेही आश्वासन दिले. दरम्यान,रुग्णालयासाठी 46 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवारांनी दिल्याचे मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

 

15 Jan, 03:00 (IST)

दिल्लीच्या  विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. आपने यादी जाहीर करताना 15 विद्यमानआमदारांना तिकीट नाकारले असून 8 महिलांना उमेदवारी दिली आहे. तसेचमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत.संपूर्ण यादी पाहण्यासाठी आम आदमी पक्ष ट्विटर हॅण्डलला भेट द्या 

15 Jan, 01:36 (IST)

मुंबईतील पूर्व द्रूतगती मार्ग म्हणजेच इस्टर्न फ्री वे मार्गाला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. यशब्दर्भात लवकरात लवकर कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास विभागाला दिली आहे.

15 Jan, 01:23 (IST)

'आजके शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यापासून एका नव्या वादाला सुरुवात झाली असून आता हा वाद अधिक चिघळत चालला आहे. शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी नुकतेच एक ट्विट करत आक्रमक भूमिका घेतली आहे. ते लिहितात, "छत्रपतींच्या घराण्याची यापुढे बदनामी कराल तर गाठ माझ्याशी आहे हे भुंकणाऱ्यांनी लक्षात ठेवाव. विनंती फिनंती करत बसणार नाही पुस्तक प्रकाशन बंद करायलाच लावत असतो. राजेशाही असती तर पुस्तक काढणारा तो गोयल पुन्हा दिसला नसता."

15 Jan, 24:12 (IST)

उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत, नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. याला उत्तर दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत, ट्विटरवर लिहिले, "होय शरद पवार हे "जाणता राजा " आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न,औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न,स्त्रीयांचे प्रश्न.. प्रश्नांची मालिका सांगा.सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून.."

14 Jan, 22:52 (IST)

'आजके शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे भाजपच्या दिल्ली कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. परंतु, या पुस्तकात पंतप्रधान मोदी यांची शिवरायांशी केलेली तुलना ही अनेकांना खटकली आहे. या पुस्तबद्दल उदयनराजे भोसले यांनी ट्विटच्या माध्यमातून पुस्तकाच्या लेखकाला इशारा दिला आहे. ते लिहितात, "लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयल ला दाखवलं असत राजेशाही काय असते."

14 Jan, 22:44 (IST)

परळमधील वाडिया रुग्णालय हे बंद होण्याच्या स्थितीत असताना, आजच्या आज 22 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे आदेश मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, स्थायी अध्यक्षांच्या या निर्देशानंतर आजच अनुदान देण्याचं प्रशासनाकडून मान्य करण्यात आलं आहे. 

14 Jan, 22:24 (IST)

कोल्हापूर दूध उत्पादक शेतक-यांसाठी आनंदाची बातमी! गोकुळ कडून गायीच्या दूध खरेदी दरात 2 तर म्हशीच्या दरात 1.70 रुपयांची वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून ही नवीन खरेदी दर लागू होणार आहे. त्यानुसार गोकुळ कंपनीला गायीच्या दूधासाठी 29 रुपये तर म्हशीच्या दूधासाठी 44 रुपये दूध उत्पादक शेतक-यांना  द्यावे लागणार आहेत. 

14 Jan, 21:41 (IST)

वाडिया रुग्णालयासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला ठाकरे  थोड्याच वेळात मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे. त्यांच्या सोबत मनसेचे काही पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशांचे शिष्टमंडळ असणार आहे. 

 

14 Jan, 20:48 (IST)

विधान परिषदेसाठी महाविकासआघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे नेते संजय दौंड यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयामुळे ती जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी दौंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेडीवार, आमदार भाई जगताप यांच्या उपस्थित ही प्रक्रिया पार पडली. 

 

14 Jan, 20:20 (IST)

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच बारामती दौ-यावर जाणार आहे. येत्या 16 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीला भेट देणार आहेत. तसेच तिथे जाऊन कृषी प्रदर्शन सोहळ्याचे उद्धाटन देखील करणार आहेत. 

14 Jan, 19:55 (IST)

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर विनय कुमार शर्मा आणि मनोज सिंह यांनी केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दोषींची फाशी अटळ असून येत्या 22 जानेवारीला सकाळी 7.00 वाजता या फाशीची अंमलबजावणी होणार आहे.

14 Jan, 19:45 (IST)

मुंबई-वाडिया प्रकरणी स्थायी समितीत जोरदार चर्चा सुरु असून सर्व सदस्यांनी  प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाने इतके दिवस गैरव्यवहार का लपवून ठेवला असा सवाल स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. 

14 Jan, 19:24 (IST)

रिझर्व्ह बँकेने मायकेल पात्रा यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेतील. IIT मुंबईमधून अर्थशास्त्रात पीएचडी केलेले पात्रा हे 2005 पासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागात काम करत आहेत.

 

14 Jan, 18:40 (IST)

मुंबई येथील भारत पेट्रोलियम प्लांटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे.  ही आग साधरण असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमनदलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 

 

14 Jan, 18:25 (IST)

स्वार्थासाठी शिवरायांच्या नावाचा वापर का करता असा सवाल करून शिवसेनेने नाव बदलून आता ठाकरे सेना करा असा खोचक सल्ला भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला दिला आहे. 

14 Jan, 18:18 (IST)

"जाणता राजा हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत, त्यामुळे मोदींची महाराजांसोबत तुलना करणे चुकीचे आहे", असे भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.  छत्रपती हे देशातील आदर्श व्यक्ती होते, त्यामुळे त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही असेही ते म्हणाले.

14 Jan, 18:10 (IST)

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकातून छत्रपती शिवरायांची तुलना करून करण्यात आलेल्या अपमानाच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवनात बैठक सुरु झाली आहे.

Read more


मुंबईतील प्रसिद्ध सरकारी रुग्णालय वाडिया रुग्णालयात बंद होण्याच्या मार्गावर आहे असं कळताच अनेकांना धक्काच बसला. रुग्णालय चालविण्यासाठी सरकार कडून देण्यात येणारी रक्कम न मिळाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या संदर्भात अनेक राजकीय पक्ष पुढे सरसावरले असून हे रुग्णालय बंद होऊ नये यासाठी मनसे पक्ष आग्रही आहे. त्याच संदर्भात आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे. वाडिया रुग्णालय बंद होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे  शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूरात बंद असलेल्या मटण विक्रीवरही तोडगा निघाला आहे. 520 रुपये किलो मटण विकण्यावर एकमत झाले असून मटण विक्रेत कृती समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

'सोनिया गांधी यांच्या नावाने शपथ घेणाऱ्या मुलाबद्दल हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटत असेल?' अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मंत्र्यांच्या गाडीचे टायर बदलण्यापूर्वी हे सरकार बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे खूपच धक्कादायक विधान असून याचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात काय पडसाद पडतात हे लवकरच कळेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now