जम्मू-कश्मीर मध्ये मोठा दहशतवादी हल्ला टळला, शॉपिंग मॉलजवळून दोन जणांना अटक

या दहशतवाद्यांकडून हत्यारे, दारु-गोळा आणि स्फोटकासंबंधित सामग्री जप्त केली आहे.

Indian Army (Photo Credits-ANI)

जम्मू मधील नरवाल परिरसातून पाच किलो आयडीईसह दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून हत्यारे, दारु-गोळा आणि स्फोटकासंबंधित सामग्री जप्त केली आहे. दहशतवाद्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने जम्मू शहरातल मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. दहशतवाद्यांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी शहराबाहेरील परिसरात स्थित असलेल्या एका प्रमुख शॉपिंग मॉलच्या येथूनच या दहशतवाद्यांना अटक केली आहे, पोलिसांना दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाली होती. याच आधारावर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले.

ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे लष्कर-ए-तौयबा मधून निघून रेजिस्टेंस फ्रंट मधील असल्याचे समोर आले आहे. दहशतवादी नदीम उल हक हा बनिहाल येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले आहे. तर नदीमला एसओजीच्या टीमकडून पुख्ता सुचनेच्या आधारेवर भठिंडीच्या मलिक मार्केट कॉप्लेक्स येथे पकडण्यात आले. नदीमसह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. जो पाकिस्तान मधील राहणारा असल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलिसांनी दुसऱ्या दहशतवाद्याच्या अटकेबद्दल पुष्टी केली नाही.(Jammu Airport च्या Technical Area मध्ये स्फोटांचे आवाज; Forensic Team,Bomb Disposal Squad घटनास्थळी दाखल)

डीजीपी दिलबाग सिंह यांनी असे म्हटले की, जम्मू-पोलिसांनी 5-6 किलोग्रॅम वजनाचा आणखी एक आयईडी जप्त केला आहे. हा गर्दीच्या ठिकाणी ठेवण्यात येणार होता. परंतु तो ताब्यात घेतल्याने मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. नदीम याची चौकशी केली जात असून यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि ते स्फोटक कुठे लावली जाणार याची चौकशी करत आहेत.

याआधी सुद्धा जम्मूमध्ये दहशतवादी संघटनेकडून आयईडी हल्ला करण्याचा कट उधळून लावण्यात आला होता. तर 14 फेब्रुवारी रोजी जम्मू पोलिसांनी अल बदर दहशतवादी संघटनेच्या सोहेल बशीर स्थानिक पुलवामा याला सात किलो आयईडीसह रघुनाथ बाजारातून ताब्यात घेण्यात आले होते. तर जम्मू मध्ये राहून गर्दीच्या ठिकाणच्या परिसराची रेकी करत होता. सोहेल चंदीगढ मधील नर्सिंगचा विद्यार्थी  असल्याचे सांगण्यात आले होते.