जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्याने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात- राहुल गांधी

मात्र माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर आपले मत मांडले आहे.

राहुल गांधी (Photo Credits: IANS)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 370 मोदी सरकारने हटवल्याने हा  ऐतिहासिक निर्णय असल्याचा आनंद सर्वत्र साजरा करण्यात आला. मात्र माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर आपले मत मांडले आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा संविधानाचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध करण्यात आला असून राज्यसभेतसुद्धा या प्रस्तावाच्या विरोधात मत देण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असून राष्ट्र हे तेथील लोकांमुळेच बनते मात्र जमीनींच्या तुकड्यांपासून बनत नाही. अशी टीका सरकारवर राहुल गांधी यांनी केली आहे. जम्मू कश्मीर मधील महबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना सुद्धा तुरुंगात टाकल्याने संविधानाचे उल्लंघन झाले आहे. अशा प्रकारने राज्याचे विभाजन केल्यामुळे राष्ट्रीय एकात्मका कायम राहणार नाही असे ही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.(मोदी सरकारने कलम 370 हटवल्याने कश्मीरी तरुणींना होणार फायदा, लागू होणार 'हे' कायदे)

जम्मू-कश्मीर विभाजन विधेयक सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडले. तर आज लोकसभेत हे विधेयक मांडण्यात आले. मात्र सोमवारी या विधेयकाच्या विरोधात काँग्रेसने विरोध केला. तसेच काँग्रेसकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद यांनी लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा दिवस असल्याचे म्हटले.

एवढेच नाही तर राज्यसभेत मांडण्यात आलेल्या या विधेयकाच्या विरोधात काँग्रेसने मत दिली. तसेच काँग्रेससह टीएमसी, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फ्रेंस यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. लोकसभेत सुद्धा या विधेयकाला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif