Poonch Terror Attack: पूंछमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान गंभीर जखमी, दहशतवाद्यांचा शोध सुरू
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात शनिवारी भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या चार जवानांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर उर्वरित तीन जवानांची प्रकृती स्थिर आहे. आयएएफने या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाची ओळख कॉर्पोरल विक्की पहाडे अशी केली आहे. सीएएस एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि भारतीय वायुसेनेचे सर्व सैनिक देशाच्या सेवेत पूंछ सेक्टरमध्ये सर्वोच्च बलिदान देणारे शूरवीर कॉर्पोरल विक्की पहाडे यांना अभिवादन करतात,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
पाहा पोस्ट -
दरम्यान, या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलाकडून ही कारवाई सुरू आहे. आदल्या दिवशी, हल्ल्याच्या ठिकाणी आयएएफ गरुड स्पेशल फोर्सेस आणि लष्कराचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले असून बसमधून हे हवाई दलाचे जवान जात असल्याची माहिती आहे. देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सीमारेषेवर सैन्य दलाकडून आणि देशात सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट व कडक बंदोबस्त तैनात आहे.