जम्मू कश्मीर: श्रीनगर मध्ये HMT भागात लष्करी जवानांवर दहशतवादी हल्ला; 2 जण शहीद
जम्मू कश्मीर मध्ये आज (26 नोव्हेंबर) दिवशी श्रीनगर (Srinagar) येथील HMT भागामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.
जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये आज (26 नोव्हेंबर) दिवशी श्रीनगर (Srinagar) येथील HMT भागामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. ANI च्या ट्वीट नुसार हा हल्ला सुरक्षा दलावर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज हा हल्ला एचएमटी भागातील इंडियन आर्मीच्या रोड ओपनिंग पार्टी मध्ये झाला आहे. यामध्ये 2 जवान अत्यंत गंभीररित्या जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
कश्मीरच्या इन्स्पेक्टर जनरल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 दहशत्वाद्यांनी आर्मी जवानांवर गोळीबार केला आहे. यापैकी 2 पाकिस्तानी 1 स्थानिक असल्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत दहशतवादी नेमक्या कोणत्या संघटनेचे होते याची माहिती मिळू शकेल. जैशचा या भागात अॅक्टिव्ह वावर आहे.
टाईम्स नाऊ ने दिलेल्या वृत्तानुसार, जखमी सुरक्षा दलातील अधिकार्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर सारा परिसर कॉर्डन ऑफ करण्यात आला असून हल्लेखोरांना शोधण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवर तणाव वाढला आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सातत्याने पाकिस्तानमधून गोळीबार सुरू होता. मागील आठवडाभरात महाराष्ट्राचे 4 जवान त्यामध्ये शहीद झाले आहेत. जम्मू कश्मीर: कुलगाम मधील चिंगम भागात 2 दहशतवाद्यांना सुरक्षा जवानांकडून कंठस्नान.
ANI Tweet
दरम्यान 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंबई मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. दक्षिण मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला होता. ग्रेनेड हल्ले केले होते. 26 नोव्हेंबर 2008 दिवशी लष्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी समुद्रीमार्गाने मुंबई मध्ये प्रवेश मिळवला होता. यामध्ये 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. तर 60 तास मुंबई दहशतीच्या सावटाखाली होती.