जम्मू काश्मीर : भारतीय सुरक्षा दलाच्या सर्च ऑपरेशनमध्ये 6 दहशतवादी ठार
जम्मू काश्मीरमध्ये त्राल (Tral) परिसरात आज दहशतवादी (Terrorists) आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना ठार मारण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश मिळालं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये(Jammu Kashmir) आज दहशतवादी (Terrorists)आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना ठार मारण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. अवंतीपोरा येथील त्राल (Tral) परिसरातील आरमपोरा या ठिकाणी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरामध्ये राबवलेल्या शोध मोहिमेत सहा जणांना ठार मारण्यात यश मिळाले आहे. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
त्राल (Tral) परिसरात आढळलेले हे दहशतवादी झाकीर मुसाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समजते आहे. सुरक्षा रक्षकांना पाहून दहशतवाद्यानी हल्ला करण्यास सुरुवात केली मात्र त्याला सडेतोड उत्तर देत सहा दहशतवादी ठार मारण्यास यश मिळाले आहे.
मागील आठवड्यातही पुलवामा भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले मात्र त्यानंतर स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले. दरम्यान झालेल्या हिंसाचारामध्ये 7 तरुण मृत्यूमुखी पडले.