Jammu and Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर लष्कराकडून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर; घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले 3 दहशतवादी ठार

तंगधार भागात एक दहशतवादी मारला गेला. अन्य दोघे माछिल जिल्ह्यात ठार करण्यात आले.

Photo Credits: X

Jammu and Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करात चकमक झाली. त्यानंतर कुपवाडामध्ये(Kupwara) लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे घुसखोरीविरोधी मोहीम सुरू केली. जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir)कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या दोन कारवाईत तीन घुसखोर ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. एक दहशतवादी तंगधारमध्ये ठार झाला आहे. तर, इतर दोन दहशतवाद्यांना मच्छल जिल्ह्यात कंठस्नान(Encounter) घातले गेले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले आहे. 28-29 ऑगस्टच्या मध्यरात्री तंगधार भागात ही कारवाई करण्यात आली. (हेही वाचा: Jammu and Kashmir: राजौरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू (Watch Video))

दहशतवादी घुसखोरीचा कट आखत असल्याची गुप्तचर भारतीय लष्कराला मिळाली होती. त्यानंतर ऑपरेशन सुरू केले. दहशतवादी मारल्यानंतरही अजून मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 28 ऑगस्ट रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकानंतर जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शोध मोहीम राबवली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 28 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजता खेरी मोहरा लाठी आणि दंथाल परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली.

बुधवारी, लष्कराच्या उत्तरी कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांच्यासह 16 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल नवीन सचदेवा यांनी सुंदरबनी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील ठिकाणांना भेट दिली आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांना सुरक्षा दलांमधील समन्वय आणि प्रदेशातील ऑपरेशनल तयारीबद्दल माहिती देण्यात आली. आर्मी कमांडरने फॉर्मेशनच्या सहाय्यक युनिट्सनाही भेट दिली.

3 दहशतवादी ठार

सर्व रँकना सर्वसमावेशक ऑपरेशनल तयारी राखण्यासाठी प्रोत्साहित केले. रोमियो फोर्सचे जीओसी मेजर जनरल मनीष गुप्ता यांच्यासह आर्मी कमांडर यांनी सीमावर्ती भागातील सैनिकांची भेट घेतली आणि त्यांना परिसरातील ऑपरेशनल तयारी आणि सुरक्षा परिस्थितीबद्दल माहिती दिली. लष्कराच्या कमांडरने जवानांचे कौतुक केले आणि भविष्यातील आव्हानांसाठी उच्च मनोबल आणि व्यावसायिकता राखण्यासाठी सर्व रँकना प्रोत्साहित केले.