Jammu And Kashmir: श्रीनगरमध्ये ड्रोन वापरावर बंदी, वापरकर्त्यांना Drone पोलीस स्टेशनमध्ये जमाकरण्याचे आदेश
ज्या लोकांकडे ड्रोन आहेत त्यांनी ती पोलिसांकडे जमा करायची आहेत. तसेच, कृषी, पर्यावरण, आपत्ती निवारण आदी विभागांकडे ड्रोन असतात. त्यांना ही ड्रोन वापरण्यापूर्वी पोलिसांना पूर्वसूचना देण्याबाबत सांगण्यात आले आहे.
जम्मू येथील भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर एक आठवड्यांनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. सतर्क झालेल्या प्रशासनाने श्रीनगर शहरात ड्रोन वापरावर बंदी (Srinagar Bans Drone) घातली आहे. ड्रोन (Drone) खरेदी आणि विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, ज्यांच्याकडे ड्रोन आहेत त्यांनी ती ड्रोन तातडीने पोलीस स्टेशनकडे जमा करायची आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद ऐजाज यांनी 3 जुलै रोजी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे ड्रोन अथवा तत्सम यंत्रं आहेत त्यांनी ती पोलिसांकडे जमा करावीत असे म्हटले आहे.
श्रीनगरमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरुन ड्रोन बाळगणे, विकणे अथवा खरेदी करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या लोकांकडे ड्रोन आहेत त्यांनी ती पोलिसांकडे जमा करायची आहेत. तसेच, कृषी, पर्यावरण, आपत्ती निवारण आदी विभागांकडे ड्रोन असतात. त्यांना ही ड्रोन वापरण्यापूर्वी पोलिसांना पूर्वसूचना देण्याबाबत सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या आदेशात म्हटले आहे की, आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच, या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. (हेही वाचा, मुंबई मध्ये INS Hamla, मार्वे रोड, मालाड पश्चिम भागात 3 किमी परिसरात ड्रोन, यूएव्ही उडवण्यास बंदी)
भारतीय हवाईदलाच्या तळावर रविवारी ड्रोनहल्ला करण्यात आला होता. ड्रोनच्या माध्यमातून स्फोटके वापरुन हा हल्ला करण्यात आला होता. भारतात महत्त्वाच्या लष्करी तळांवर पाकिस्तानातील संशयित दहशतवाद्यांकडून मानवविरहीत हवायी यंत्रं (यूएवी-ड्रोन) वापरुन हल्ला करण्याचा हा प्रकार होता.