जम्मू-काश्मीर: CRPF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; तिघांचा मृत्यू

एका जवानाने सहकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर सहकाऱ्यांवर गोळीबार केला.

3 CRPF jawans shot dead by fellow soldier (Photo Credits: ANI)

जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) येथील उधमपूर (Udhampur) येथे सीआरपीएफ (CRPF) तळावरुन एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका जवानाने सहकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर सहकाऱ्यांवर गोळीबार केला. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार केल्यानंतर या जवानाने आत्महत्येचा प्रयत्न केला. अजित कुमार असे या गोळीबार आणि आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जवानाचे नाव आहे.

उधमपूर येथील बट्टल बलियान येथील सीआरपीएफ तळावर CRPF चे 187 जवान होते. यातील अजित कुमार आणि सहकाऱ्यांमध्ये काही शुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यानंतर अजित कुमारने स्वतःच्या बंदुकीतून गोळीबार केला. यात तिघांचा मृत्यू झाला. हेड कॉन्स्टेबल पोखरमल, योगेंद्र शर्मा आणि उम्मिद सिंह अशी या मृत जवानांची नावे आहेत. मात्र वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ANI ट्विट:

साथीदारांवर गोळीबार केल्यानंतर अजित कुमारने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.