Jamia Violence: 15 डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात जामियाचे तब्बल 2.66 कोटींचे नुकसान; विद्यापीठाने HRD ला पाठवले बिल

नरेंद्र मोदी सरकारकडून सीएए (CAA) लागू झाल्यानंतर, जामिया विद्यापीठात (Jamia Millia Islamia University) निषेध सुरू झाला. त्याच निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) लायब्ररी आणि कॅम्पसची तोडफोड केल्याप्रकरणी

Screengrab of CCTV footage | (Photo Credits: Youtube/Maktoob Media)

नरेंद्र मोदी सरकारकडून सीएए (CAA) लागू झाल्यानंतर, जामिया विद्यापीठात (Jamia Millia Islamia University) निषेध सुरू झाला. त्याच निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) लायब्ररी आणि कॅम्पसची तोडफोड केल्याप्रकरणी, जामियाने मानव संसाधन विकास मंत्रालयाला (Ministry of Human Resource Development) 2.66 कोटींचे बिल पाठवले आहे. गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामिया येथे, दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2.66  कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

यात 25 सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे नुकसान झालेले आहे, ज्याची किंमत 4.75 लाख आहे. गेल्या काही दिवसांत जामियाच्या सीसीटीव्ही फुटेजवरून अनेक व्हिडिओ क्लिप्स प्रसिद्ध झाल्या आहेत. यात पोलिस विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करत असल्याचे दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये विद्यापीठाच्या मालमत्तेचेही नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओंमध्ये असे दिसून आले आहे की, लायब्ररीत बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे हाताने तोडण्यात आले आहेत. यावर पोलिसांनी, हे व्हिडीओ एडीट केले असल्याचे म्हटले आहे. पोलीस अद्याप याची सत्यता पडताळून पाहत आहेत. हिंसाचाराच्या काही दिवसांनंतर विद्यापीठाच्या अधिका्यांनी 'द इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले होते की, मालमत्तेचे नुकसान सुमारे अडीच कोटी रुपये आहे आणि याबाबत लवकरच अहवाल प्रसिद्ध केला जाईल.

त्यानंतर ग्रंथपाल तारिक अशरफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रंथालयातील सर्वात जास्त नुकसान काचा तुटण्यामुळे झाले आहे. लायब्ररीमाधीन अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ट्यूबलाइट्स इत्यादींचे नुकसान झाले आहे. मात्र महत्वाची पुस्तके किंवा हस्तलिखितांना स्पर्श झाला नाही. पोलिसांच्या कारवाईत लायब्ररीची उपकरणे, दारे, खिडकी, एसी युनिट, इलेक्ट्रिकल सिस्टम, खुर्च्या, टेबल्स, दिवे व आरसे खराब झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विद्यापीठाच्या अंदाजानुसार 55 लाख रुपयांच्या इतर उपकरणांचेही नुकसान झाले आहे. (हेही वाचा: जेएनयूमधील तोडफोड-हाणामारीवर NCP चे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया)

विद्यापीठाने सांगितले की, हिंसाचारात 41.25 लाख किंमतीचे 75 दरवाजे, 22.5 लाखांची विंडो पॅन, 18 लाख रुपयांचे रेलिंग्ज, 15 लाख रुपये किमतीचे हार्डवेअर आणि 14 लाख रुपयांचे 35 लायब्ररी टेबल्सचे नुकसान झाले आहे. विद्यापीठात 7 लाख रुपयांच्या 175 खुर्च्या, 6 लाख रुपयांचे टॉयलेट आयटम्स, 7.5 लाख रुपयांच्या वनस्पती, 8 लाख रुपयांच्या फरशा आणि 15  लाख रुपयांचे अल्युमिनियम दरवाजे इ. नुकसान झालेले दिसून येत आहे.

यासह भिंतींवरून पेंट निघाल्यामुळे सुमारे 22.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जामियामध्ये 165 दिवे (12.4 लाख रुपये), दगडी प्रतिकृती (3.8 लाख रुपये), छत (5.5 लाख रुपये) आणि दगडावर अंकुश (अडीच लाख रुपये) लावणे यांचे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, नुकसान झालेल्या 75 आरशांची किंमत 72,630 रुपये आहे आणि इतर काचांची किंमत 72,000 रुपये आहे. अशाप्रकारे जवळजवळ 2.66  कोटी रुपयांचे बिल जमियाने मोदी सरकारला पाठवले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now