Jaipur-Mumbai Express Train Firing: 3 प्रवासी आणि वरिष्ठांवर गोळी झाडणार्या RPF Constable Chetansinh Chaudhary बडतर्फ
RPF constable Chetansinh Chaudhary प्रवाशांसह वरिष्ठावर गोळी का चालवली यामागील हेतू सांगितलेला नाही.
RPF Constable Chetansinh Chaudhary ज्याने मागील महिन्यात आपल्या वरिष्ठांसह 3 प्रवाशांवर गोळ्या झाडल्या होत्या त्याला अखेर सेवेतून बडतर्फ केले आहे. आज (17 ऑगस्ट) याची माहिती देण्यात आली आहे. Railway Protection Force चे सिनियर डिव्हिजनल सिक्युरिटी कमिशनर यांच्याकडून सोमवारी याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. चौधरीचा रेकॉर्ड पाहता त्याच्यावर किमान 3 शिस्तीशी निगडीत चौकशा सुरू आहेत.
34 वर्षीय चौधरी याने जयपूर- मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये 31 जुलै च्या सकाळी पालघर स्टेशन जवळ आपल्या वरिष्ठांसह 3 जणांवर गोळीबार केला होता. ट्रेनच्या वेगवेगळ्या बोगी मध्ये Abdul Kadar Mohamed Hussain Bhanpurawala, Sayyad Saifuddin आणि Asgar Abbas Shaikh प्र्वास करत होते. त्यांच्यावर चौधरीने आपल्या सर्व्हिस रिव्हॉलवर मधून गोळ्या झाडल्या.
जीआरपी कडून नंतर चौधरीला अटक करण्यात आली आहे. या गोळीबारामागील हेतू अद्याप सांगण्यात आलेला नाही. नक्की वाचा: Jaipur Express Firing: मुंबईत जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, आरपीएफ जवान पोलिसांच्या ताब्यात, मृतदेह बोरीवली स्टेशनवर (Watch video) .
चौधरीने पहिला RPF Assistant Sub-Inspector Meena यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर तो बी5 मध्ये गेला. तेथे हल्ला करून पेन्ट्री कार आणि एस6 मधील अजून एका प्रवाशावर गोळी चालवली. सध्या आरोपी चौधरी न्यायालयीन कोठडी मध्ये आहे. पोलिसांनी चौधरीच्या सध्याच्या आणि पूर्वीच्याही सहकारी, वरिष्ठांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे.