आयटी कंपन्यांना 31 जुलै पर्यंत वर्क फ्रॉम होम? केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिले स्पष्टीकरण

याचा अर्थ वर्क फ्रॉम होम 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आले असा होत नाही.

Work From Home (Photo Credits: Needpix)

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी आयटी (IT) क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची (Work From Home) मर्यादा 30 एप्रिल पासून पुढे वाढवत 31 जुलैपर्यंत केली असल्याची चर्चा माध्यमांमध्ये होत आहे. काल राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर प्रसाद यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला आणि त्यात हा निर्णय सुनावण्यात आला असा दावा केला जातोय. मात्र अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण रवी शंकर प्रसाद यांनी दिले आहे, वास्तविक रवी शंकर यांनी वर्क फ्रॉम होमच्याबाबत बोलताना रवी शंकर यांनी आयटी क्षेत्रातील अनेकांनी घरून काम करणाची तयारी दाखवली असल्याने या मंडळींसाठी VPN च्या सुविधांवरील अटी या 31 जुलै पर्यंत शिथिल करत असल्याचे म्हंटले होते. याचा अर्थ वर्क फ्रॉम होम 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आले असा होत नाही. May 2020 Bank Holiday List: महाराष्ट्र दिन ते रमजान ईद मुळे यंदा पहा कधी बंद राहणार बॅंक?

वर्क फ्रॉम होम संदर्भात इंटरनेट आणि कनेक्टिव्हीटी च्या सुविधांसोबतच पेमेंट्सच्या बाबत ही अनेक सवलती सरकारने देण्यात आल्या आहेत. या सवलतींचा अवधी यापूर्वी 30 एप्रिल पर्यंत असेल असे ठरवण्यात आले होते, मात्र सद्य घडीला घरुन काम करणे हे सर्वसामान्य मंडळींसाठी सोयीचे व्हावे म्ह्णून ही सवलत 31 जुलै पर्यंत देण्यात येणार आहे असं प्रसाद यांनी म्हंटले आहे.

रवी शंकर प्रसाद ट्विट

दरम्यान, या बैठकीत काल रवी शंकर प्रसाद यांनी प्रसाद यांनी आरोग्य सेतू अ‍ॅप बनवणाऱ्यांचे कौतुक केले. ई-पास या अ‍ॅपवरुन उपलब्ध करुन देण्याची सुविधा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच डिजीटल पेमेंटसारख्या गोष्टी टपाल खात्याकडून छान पद्धतीने हाताळल्या जात आहेत असे म्हणत प्रसाद यांनी टपाल खात्याचे सुद्धा कौतुक केले. तसेच येत्या काळात इलेक्ट्रॉनिक बाजारात व्यापारासाठी भारताला उत्तम संधी आहे त्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेऊन गुंतवणूक करावी व राज्य आणि केंद्र सरकारने त्यांनी प्रोत्साहन द्यावे असेही प्रसाद म्हंटले आहे.