एमीसॅट सह 28 नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; ISRO ने अंतराळ विश्वात रचला नवा इतिहास

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आज सकाळी 9:27 वाजता भारतीय रॉकेट पोलर सॅटलाईट लॉन्च व्हेहीकल द्वारे लेक्ट्रॉनिक इंटेलीजेंस उपग्रह, एमिसॅटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

EMISAT Satellite Launched (Photo Credits: ANI)

इंडियन स्पेस रिसर्च सेंटरने (The Indian Space Research Organisation) पीएसएलव्ही C45 (PSLV-C45) लॉन्च करत नवा इतिहास रचला आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीहरिकोटा (Sriharikota) येथून आज सकाळी 9:27 वाजता भारतीय रॉकेट पोलर सॅटलाईट लॉन्च व्हेहीकल (Polar Satellite Launch Vehicle) द्वारे लेक्ट्रॉनिक इंटेलीजेंस उपग्रह, एमिसॅटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यात इतर देशांचे 28 नॅनो उपग्रहांचे देखील प्रक्षेपण झाले. एमिसॅटचे प्रक्षेपण संरक्षण संशोधन व विकास संस्थेसाठी (Defense Research and Development Organisation) केले गेले. यात अमेरिकेतील 24, लिथुआनियातील 11 ,स्पेनमधील 1 तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे. इंडियन स्पेस रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6:27 मिनिटांपासून काऊनडाऊनला सुरुवात झाली.

एमिसॅटसह सर्वप्रथम 749 किलोमीटरवर स्थिरावेल. यानंतर तो 28 उपग्रहांना 504 किलोमीटरच्या उंचीवर प्रस्थापित करेल.

ANI ट्विट:

पहा व्हिडिओ:

 

एमीसॅटमुळे होणारे फायदे:

एमीसॅटमुळे शत्रूच्या रडारची, संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होईल. गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानी हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येईल. रात्रीच्या वेळी देखील या उपग्रहाद्वारे फोटो काढता येतील. तसंच शत्रूच्या भागात मोबाईल सह अन्य किती संवाद उपकरणे अॅक्टीव्ह आहेत, याचीही माहीती या उपग्रहाद्वारे सुरक्षा यंत्रणांना मिळेल.

इस्रोचे अध्यक्ष  के. सिवान यांनी सांगितले की, "आमच्यासाठी हे खास मिशन आहे. आम्ही चार स्ट्रॅप ऑन मोटर्ससह पीएसएलव्ही रॉकेटचा वापर केला आहे. याशिवाय आम्ही पहिल्यांदाच तीन वेगवेगळ्या उंचीवर रॉकेट स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे."