IRCTC Server Down: आयआरसीटीसी सर्व्हर डाउन; टीडीआर, ई-तिकीट काढण्यासाठी काय कराल? घ्या जाणून

आयआरसीटीसीचे संकेतस्थल सर्व्हर डाऊन झाल्याने ठप्प झाले आहे. परिणामी नागरिकांना टीडीआर रद्द करण्यासाठी/फाईल करण्यासाठी आणि ईतिकीट काढण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी काय करायला हवे? घ्या जाणून

IRCTC Server Down | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (Indian Railway Catering and Tourism Corporation) अर्थातच आयआरसीटीसी (IRCTC) ही भारतातील सर्वाधिक वापरली जाणारी सार्वजनिक सेवा आहे. ही सेवा उपलब्ध करुन देणारे या कंपनीचे संकेतस्थळ सर्व्हर डाऊन (IRCTC Server Down) झाल्याने ठप्प आहे. ज्याचा फटका नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रवासाला निघणाऱ्या आणि सामान्य प्रवासांनाही बसत आहे. आयआरसीटीच्या ग्राहकांना संकेतस्थळावरुन सेवा घेताना अडथळा येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आयआरसीटीसी पर्यायी व्यवस्था काय?

आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाला भेट दिली असता स्क्रिनवर डाउनटाइम मेसेज (DOWNTIME MESSAGE) झळकतो आहे. आयआरसीटीसीचा सर्व्हर डाऊन झाल्याने पर्यायी व्यवस्था जाणून घ्यायची असेल तर स्क्रिनवर आलेला संदेश निट वाचा. ज्यामध्ये म्हटले आहे की, ''सर्व साइटसाठी बुकिंग आणि रद्दीकरण पुढील तासासाठी उपलब्ध होणार नाही. झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून खेद व्यक्त केला जात आहे. , कृपया ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करा. 14646,08044647999 आणि 08035734999 किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा'', अशी सूचनाही मिळत आहे. (हेही वाचा, IRCTC Super App: आयआरसीटीसी चं नवं अ‍ॅप झालं लॉन्च; आता तिकीट बुकिंग सह अन्य सुविधा देखील होणार उपलब्ध)

आयआरसीटीसी काय आहे?

आयआरसीटीसी म्हणजे भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ. ही भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे जी तिकीट, खानपान आणि पर्यटन सेवा पुरवते. आयआरसीटीसी हे भारतातील रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठीचे प्राथमिक ऑनलाइन व्यासपीठ आहे. ते इतर विविध सेवा देखील प्रदान करते, जसे कीः

सर्व्हर डाऊन झाल्याने तिकीट खरेदीत अडथळा

आज 31 डिसेंबर आहे. म्हणजेच 2024 या वर्षातील शेवटचा दिवस. रात्री 12.00 वाजलेनंतर जगभरात नव्या वर्षाचे स्वागत केले जाईल. या स्वागतासाठी देशभरातील नागरिक सज्ज झाले असताना अनेकांनी पर्यटन आणि प्रवासाची योजना आखली आहे. त्यासाठी सर्वात स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिले जाते. अशा वेळी देशभरातील अनेक नागरिक प्रवास करण्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाला भेट देतात. जेणेकरुन तातडीने ई-तिकीट खरेदी करता येईल आणि त्यासोबतच भारतीय रेल्वेच्या इतरही सेवा घेता येतील. असे असताना अत्यंत महत्त्वाच्या दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आयआरसीटीसीने पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यांना ग्राहक समस्या निवारण संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्याचा उल्लेख वर करण्यात आला आहे. जो वापरुन आपण आपल्या समस्यांचे निराकरण करु शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now