Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना मत दिले अन् संसार मोडायची वेळ आली; संताप्त पत्नीची घटस्फोटासाठी कोर्टात धाव

निवडणुकीचे निकाल आल्यानंतर एकाचा हसता खेळता संसार मोडायची वेळ आली आहे. पतीने डोनाल्ड ट्रम्प यांना मत दिल्यामुळे त्याला घटस्फोट देण्यासाठी पत्नी कोर्टात गेली.

Donald Trump (PC - File Image)

Donald Trump: अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर एकाचा हसता खेळता संसार मोडायची वेळ आली आहे. पतीने डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मत दिल्यामुळे त्याला घटस्फोट देण्यासाठी पत्नी कोर्टात गेली. यावर त्या व्यक्तीने आश्चर्य व्यक्त केल आहे. त्या व्यक्तीने सांगितले की ती या कारणासाठी तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्यास तयार आहे. घटस्फोटाची (Divorce) कागदपत्रे इतक्या लवकर कशी दिली जाऊ शकतात आणि राजकारणामुळे लग्न मोडण्यास कसे कारणीभूत ठरू शकते याबद्दल नाराज पतीने सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली. (Sunita Williams Health Update: अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सने वजन कमी झाल्याच्या तर्कवितकांना खोडून काढले; आरोग्याविषयी नेमक काय बोलली?)

पत्नीने घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली

अमेरिकन व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिले, 'मी ट्रम्प यांना मत दिले, माझ्या पत्नीने मला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली. मी काय करू? "इतक्या लवकर घटस्फोटाची कागदपत्रे मिळणे शक्य आहे हे मला माहीत नव्हते.' त्या व्यक्तीने पुढे लिहिले, 'मला काय बोलावे हे देखील कळत नाही? राजकारणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाया घालवायला तयार असलेल्या एका महिलेशी मी लग्न केले याचे मला आश्चर्य वाटते. गेल्या आठवड्यात आम्ही आनंदी होतो, आज आम्ही घटस्फोट घेत आहोत.'

त्याने पुढे लिहिले की, 'ती चर्चा करण्यासही तयार नाही, ती म्हणते की तिचा विचार काही बदलणार नाही, ती ठामपणे सांगते की ती माझ्या पालकांना कळवणार आहे. त्यामुळे आता मी माझ्या कुटुंबासोबत आहे.'

बायकोच्या उत्तराने आश्चर्य वाटले

त्या व्यक्तीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी ते घर विकत घ्यावे अशी तिची इच्छा आहे, आमच्याकडे त्यात $300k आहे आणि आम्ही 3 वर्षांपूर्वी ते विकत घेतल्यापासून आम्ही 4-बे गॅरेज देखील बांधले आहे. मला घटस्फोट सहन होत नाहीये. जेव्हा मी तिला हे सांगितले तेव्हा ती तिच्या वस्तू पॅक करत होती. मला खात्री नाही की मी तिच्याशी तर्क करू शकेन. मी कुठून सुरुवात करू? निवडणूक निकालानंतर अशी परिस्थिती आणखी कोणाला भेडसावत आहे का?', असे त्या व्यक्तीने म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif