Inflation Rate Update: महागाई दराने गाठला मागील 8 वर्षांमधील उच्चांक; अन्नधान्य महागाईचा दर 8.38%
हा सलग चौथा महिना आहे ज्यावेळेस Consumer Price Index वर आधारित महागाई दर हा आरबीआयच्या टार्गेट लिमिटपेक्षा अधिक आहे.
2 वर्ष कोविड 19 चं संकट आणि त्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध यामुळे जगभरात महागाई वाढत आहेत. भारतामध्येही दिवसेंदिवस वाढणारा महागाईचा दर आता चिंतेचा विषय बनत आहे. नुकत्याच जाहीर करण्यात माहितीनुसार भारतामध्ये महागाईच्या दराने (Inflation Rate) मागील 8 वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. मार्चमध्ये 7.68% वर असलेला महागाईदर आता एप्रिल महिन्यात 8.38% वर पोहोचला आहे.
एप्रिल महिन्यातील महागाई दर हा RBI च्या comfort zone पेक्षा 2-6% अधिक आहे. हा सलग चौथा महिना आहे ज्यावेळेस Consumer Price Index वर आधारित महागाई दर हा आरबीआयच्या टार्गेट लिमिटपेक्षा अधिक आहे. यंदा एप्रिल महिन्यातील महागाई 7.79 % वर पोहोचली आहे. त्या मागील महिन्यात म्हणजेच मार्च 2022 मध्ये महागाईचा दर 6.95% होता. यंदाच्या तुलनेत मागील वर्षी एप्रिल 2021 मध्ये हाच महागाई दर 4.23 टक्के होता.
महागाई वाढण्यामध्ये भाजीपाल्याची महागाई सर्वाधिक आहे. मार्चमहिन्यातील भाज्यांची महागाई 11.64 टक्के वरून एप्रिल महिन्यात ती 15.41 टक्क्यांवर पोहोचली आहे. रिटेल महागाई दर हा जानेवारी 2022 पासूनच 6% वर आहे. एप्रिल महिन्यातील हा 7.79 महागाई दर दर सप्टेंबर 2014 पासूनचा आतापर्यंतचा सर्वाधिक महागाई दर आहे.
सध्या पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. मागील काही दिवसांत अनेक महत्त्वाच्या वस्तूंचे दर वाढले आहेत. आरबीआयनेही रेपो रेट मध्ये वाढ केल्याने सामान्यांचे कर्जाचे हप्तेही महागले आहेत.