भारतात 1429 नव्या COVID-19 रुग्णांसह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 24,506 वर- आरोग्य मंत्रालय
तर 5063 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे
भारतात (India) कोरोना व्हायरस ने अक्षरश: हैदोस घातला असून जगभरात तर कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरु केले आहे. भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 24,506 वर पोहोचली असून 18,668 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर 5063 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर भारतात एकूण 775 रुग्ण दगावल्याचेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात न आल्याने हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घ्यावा लागला. मात्र ही संख्या जर आटोक्यात आली नाही तर लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1,258 कोरोना बाधितांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या 51,017 वर
महाराष्ट्रात (Maharashtra) आज 394 नवीन कोरोन व्हायरसचे रुग्ण व 18 मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यात एकूण संक्रमितांची संख्या 6817 व मृतांचा एकूण आकडा 310 झाला आहे. आजपर्यंत एकूण 957 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.
तर मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरसचे (Coronavirus) नवे 357 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4589 वर पोहचला. पुणे मंडळात एकूण 1020 रुग्ण झाले आहेत.