भारतात वाघांची संख्येत दुप्पट वाढ; देशातील व्याघ्र गणनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद; प्रकाश जावडेकर यांची माहिती
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चार वर्षांच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने वाघांची संख्या दुप्पट वाढवण्यासाठी हाती घेतलेल्या संकल्पाची पूर्ती केल्याचा आनंद व्यक्त केला आहे
भारताच्या 2018 च्या व्याघ्र गणनेने (Tigers Census In India) आतापर्यंतचा सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅप वन्यजीव सर्वेक्षण करण्याचा विक्रम नोंदविला आहे. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book Of World Records) मध्ये सुद्धा नोंद घेण्यात आली आहे. 2018-19 मध्ये करण्यात आलेल्या वाघांच्या गणनेनुसार “साधनसंपत्ती आणि एकत्रित केलेल्या डेटा या दोन्ही बाबतीत आतापर्यंतची सर्वांत व्यापक माहिती भारताने मांडली असल्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे सांगण्यात आले आहे. याबाबत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी माहिती देत चार वर्षांच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने वाघांची संख्या दुप्पट (Number Of Tigers In India) वाढवण्यासाठी हाती घेतलेल्या संकल्पाची पूर्ती केल्याचा आनंद व्यक्त केला आहे .Guinness Book Of World Records: केरळ च्या व्यक्तीने 60 हजार मधमाश्या 4 तास चेहऱ्यावर चिकटवून केला होता हटके विक्रम (Watch Video)
वाघांच्या गणनेने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला कारण आम्ही इतर देशांच्या तुलनेत या कामासाठी अधिक कॅमेरे बसविले आहेत. भारतात जवळपास 3000 वाघ असून त्यांची संख्या जगाच्या वाघाच्या संख्येच्या जवळपास 70% आहे, असेही जावडेकर म्हणाले. जावडेकर यांनी सांगितले की, ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅप 26 हजार 760 वेग-वेगळ्या जागांवर लावण्यात आला होता. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जवळपास तीन कोटींपेक्षा जास्त फोटो काढण्यात आले आहेत.
PIB ट्विट
भारतातील 50 व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानातील वाघांची आकडेवारी पाहिल्यास 2006 साली असलेल्या 1411 वाघां संख्येत वाढ होऊन आता 2019 मध्ये 2 हजार 967 वाघ भारतात आहेत. यात आजच्या तारखेनुसार ही संख्या 3000 इतकी असू शकते. 2004 पासून भारत सरकार राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) आणि भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय) यांच्या नेतृत्वात दर चार वर्षांनी विविध राज्य वन विभाग आणि संवर्धन स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जनगणना करीत आहे.