Indian Stock Market Update: सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वधार, पेटीएमची घसरण सुरुच; जाणून घ्या भारतीय शेअर बाजाराचा कल

गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market News) आपला वधार कायम ठेवताना पाहायला मिळत आहे. आज (10 एप्रिल) सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex ) आणि एनएसई निफ्टी-50 (NSE Nifty-50) हे दोन्ही हिरव्या रंगात पाहायला मिळाले.

Indian Stock Market | (Photo credit: archived, edited, representative image)

गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market News) आपला वधार कायम ठेवताना पाहायला मिळत आहे. आज (10 एप्रिल) सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex ) आणि एनएसई निफ्टी-50 (NSE Nifty-50) हे दोन्ही हिरव्या रंगात पाहायला मिळाले. सेन्सेक्सने दिवसाची सुरुवात 74,953.96 वर केली. सेन्सेक्समध्ये 270.26 अंकांनी म्हणजेच 0.36 टक्क्यांनी वाढ झाली, तर निफ्टी फिप्टी 77.50 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी वाढून 22,720.25 वर सुरू झाला. दरम्यान, निफ्टी बँक निर्देशांकात मात्र काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. बँक निफ्टीमध्ये 12 बँकिंग समभागांच्या डेटाचा समावेश आहे, तो सध्या घस 48,700 वर लाल रंगात पाहायलमा मिळत आहे. बाजार बंद झाला तेव्हा काल तो 48,960.75 च्या नवीन उच्चांकावर पोहोचला होता.

स्टॉक मार्केटमधील आजचे टॉप गेनर्स

- रिलायन्स इंडस्ट्रीज (+1.27%)

- JSW स्टील (+0.99%)

- टाटा मोटर्स (+0.78%)

- M&M (+0.68%)

- कोटक महिंद्रा बँक (+0.65%)

- टाटा स्टील (+1.96%)

- भारती एअरटेल (+1.62%)

पेटीएमची घसरण कायम

नकारात्मक बाजूने, पेटीएम पेमेंट्स बँकेचे सीईओ आणि एमडी सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिल्यानंतर पेटीएम शेअर्समध्ये 3% घसरण झाली. ही घसरण आजही कायम आहे. कंपनीने नियामकाकडे दाखल केलेल्या माहितीनुसार चावला यांनी ‘वैयक्तिक कारणांमुळे’ राजीनामा दिला. हा राजीनामा 26 जूनपासून लागू होणार आहे. दरम्यान, पेटीएमचे शेअर्स घसरु लागले आहेत. (हेही वाचा, SEBI Bans Naked Short Selling: नेकेड शॉर्ट सेलिंग नियमात बदल, संस्थात्मक गुंतवणूकदाराला डे ट्रेडिंग करण्यास परवानगी नाही- सेबी)

शेअर बाजाराची कालची स्थिती

भारतीय शेअर बाजार प्री-ओपन सत्रादरम्यान, सेन्सेक्स 270.26 अंकांनी म्हणजेच 0.36 टक्क्यांनी वाढून 74,953.96 वर सकारात्मक व्यवहार करत होता, तर निफ्टी50 77.50 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी वाढून 22,720.25 वर हिरव्या रंगात व्यवहार करत होता. 9 एप्रिल रोजी बीएसई सेन्सेक्स 58.80 अंकांनी म्हणजेच 0.08 टक्क्यांनी घसरून 74,683.70 वर बंद झाला. निर्देशांकाने 75,124.28 चा इतिहासातील विक्रमी उच्चांक गाठला. दरम्यान, NSE निफ्टी 0.10 टक्क्यांनी घसरून 22,642.75 वर स्थिरावला. कालच्या व्यापारादरम्यान निर्देशांकाने 22,768.40 या नवीन उच्चांकालाही स्पर्श केला.  (हेही वाचा, हेही वाचा, Indians Saving And Investment: बँकांमधील बचत घटतीय, भारतीयांचा पैसा जातोय तरी कोठे? काय आहे गुंतवणूक फंडा?)

दरम्यान, दरम्यान, बाजारात दिसत असलेली तेजी ही गुंतवणूकदारांना आकर्षित करत असली तरी ती चिरंतन टिकणारी असत नाही. त्यामुळे बाजाराची पूर्वपिठीका पाहणेही महत्त्वाचे ठरते. तुम्ही जर दिर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला फार चिंता करण्याचे कारण नाही. मात्र, तुम्ही लघुकालावधीसाठी गुंतवणूक करुन आर्थिक मोबदला मिळविण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वेळीच सावध होणे गरजेचे आहे. खास करुन, स्मॉल आणि मीडियकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. भारतीय शेअर बाजार पाठिमागील काही काळापासून वधारलेला पाहायला मिळत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now