Election निकालापूर्वी Share Market मध्ये मंदी, Sensex तब्बल 572 अंकांनी कोसळला

मात्र मुंबई शेअर बाजारात (Share Market) गुरुवारी मंदी आली आणि सेनसेक्स 572 अंकांनी खाली कोसळला आहे.

शेअर मार्केट (फोटो सौजन्य- फेसबुक)

राज्यातील चार विधानसभा निवडणुकांचे निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. मात्र मुंबई शेअर बाजारात (Share Market)  गुरुवारी मंदी आली आणि सेनसेक्स 572 अंकांनी खाली कोसळला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचे एका दिवसात 2.28 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सेनसेक्स (Sensex)  572 अंकांनी खाली येऊन 35,132 अंकावर थांबला तर निफ्टी (Nifty) 182 अंकांनी खाली येऊन 10,601 अंकांवर थांबला. या स्थितीमुळे बांधकाम कंपन्या, आयटी, ऑटोमोबाईल कंपन्यांच्या शेअरचे मोठ्या प्रमाणावर कोसळले आहे. तर 5 डिसेंबर रोजी शेअर बाजाराचे भाव 142 लाख कोटी रुपये एवढे होते. तसेच 6 डिसेंबरला 139.72 लाख कोटी झाले.

शेअर मार्केट आणि सेनसेक्स कोसळल्याची कारणे

- 'यूवाय' या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत घोटाळा झाला. त्यामुळे फायनान्शिअल अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. त्याचे पडसाद भारतावर झाले.

-बाजारभावानुसार कर्जावरील व्याजदर ठरविणाऱ्या रिझर्व्ह बँकवर ही परिणाम दिसून आला.

-चीन मधील व्यापारयुद्ध न थांबण्याची चिन्हे, रुपयाचे अवमूल्यन या आर्थिक कारणामुळे येत्या आठवड्यातील चार निवडणूकांचे निकाल आहेत. मात्र या स्थितीमुळे शेअर बाजारात अशी स्थिती निर्माण झाली आहे.