Railway Charting Time Revised: 1 जुलैपासून ट्रेन सुटण्याआधी 8 तास Reservation Charts जारी होणार
1 जुलैपासून आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर केवळ प्रमाणित यूजर्सना तत्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी दिली जाईल आणि जुलैच्या अखेरीस तत्काळ बुकिंगसाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण केले जाईल, अशी घोषणा रेल्वेने केल्यानंतर हा बदल समोर आला आहे.
इंडियन रेल्वे (Indian Railway) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 जुलै पासून आता ट्रेन आता सुटण्यापूर्वी 8 तास आधी रिझर्व्हेशन चार्ट (Reservation Charts) बनवला जाणार आहे. यापूर्वी हा चार्ट 4 तास आधी बनवला जात होता. वेटिंग लिस्ट वर असलेल्या प्रवाशांच्या फायद्यासाठी आणि पुढील ट्रीप च्या प्लॅनिंग साठी रेल्वे कडून हा नियम बदलण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक स्पष्टता मिळेल आणि जर त्यांचे रेल्वे तिकीट कन्फर्म झाले नाही तर पर्यायी प्रवास व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
".. जिथे जिथे जवळच्या भागातून प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी येत असतील तिथे ही अनिश्चितता गंभीर समस्या निर्माण करू शकते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी, रेल्वे बोर्डाने सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे," असे रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे. "रेल्वेमंत्र्यांनी या प्रस्तावाशी सहमती दर्शवली आणि कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश मंडळाला दिले," असे त्यात पुढे म्हटले आहे.
"प्रवाशांना प्रतीक्षा यादीच्या स्थितीबद्दल पहिले अपडेट खूप आधीच मिळेल. यामुळे दूरच्या ठिकाणांहून किंवा मोठ्या शहरांच्या उपनगरांमधून लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल. प्रतीक्षा यादीची पुष्टी न झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यासाठी अधिक वेळ मिळेल," असे रेल्वेने म्हटले आहे, तसेच प्रतीक्षा यादीतील तिकिटे असलेल्या प्रवाशांसाठी अनिश्चितता कमी होईल असे रेल्वेने म्हटले आहे.
भारतीय रेल्वेने असेही म्हटले आहे की ते या वर्षी डिसेंबरपर्यंत आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) सुरू करेल. रेल्वे मंत्री Ashwani Vaishnaw यांनी प्रवासी आरक्षण प्रणालीच्या अपग्रेडेशनचा आढावा घेतला, असे त्यात म्हटले आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) कडून गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकल्प राबविला जात आहे.
"नवीन अपग्रेडेड पीआरएस डिझाइन... सध्याच्या भारापेक्षा दहा पट जास्त भार सहन करण्यास सक्षम आहे. यामुळे तिकीट बुकिंग क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल... त्यामुळे प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकीट बुकिंग करता येतील. सध्याच्या पीआरएसमध्ये प्रति मिनिट 32,000 तिकिटांपेक्षा ही सुमारे पाच पट वाढ असेल," असे त्यात म्हटले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)