महिलांना 'या' पदांवर नोकरी देण्यास रेल्वे प्रशासनाचा नकार

भारतीय रेल्वे आता काही खास पदांसाठी महिलांना नोकरी देणार नाही.

Representational Image | (Photo Credits: PTI)

रेल्वेत नोकरी करु इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे आता काही खास पदांसाठी महिलांना नोकरी देणार नाही. यापूर्वी या पदांवर महिलांना नोकरी देली जात होती. मात्र या काही पदांवर महिलांना नोकरी देण्याचा अनुभव चांगला नव्हता. या निर्णयामागची भूमिकाही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. रेल्वेत अशी काही पदे आहेत, त्यामुळे महिलांसाठी धोका उत्पन्न होऊ शकतो. पूर्वी या पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली होती. तसंच या निर्णयात कुठेही लिंगभेद करण्याची इच्छा नाही. मात्र महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या पदांवर महिलांना नोकऱ्या दिल्या जाणार नाहीत

लोकल ट्रायव्हर्स, ट्रेन गार्ड्स, ट्रॅकमॅन या काही पदांवर रेल्वे आता महिलांची नियुक्ती करणार नाही. यापूर्वी या पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या सर्व कामांसाठी अधिक वेळ द्यावा लागतो. तसंच कामानिमित्त असुरक्षित ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे अशा प्रकारच्या कठीण कामातून महिलांना वगळण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

सध्या रेल्वेत 13 लाख कर्मचारी आहेत. यात महिलांचे प्रमाण 3% आहे. रेल्वे यंत्रणा सुधारण्याऐवजी महिलांना नोकरीपासून दूर ठेवत आहे, अशा प्रकारच्या टीकाही या निर्णयानंतर  रेल्वे प्रशासनावर होत आहेत.