मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्यांना खास गिफ्ट! 12 ते 25 हजार रूपयांची होणार पगारवाढ
यामुळे कर्मचार्यांच्या वेतनामध्ये हजारोंची वाढ होणार आहे. रेल्वेच्या लोको पायलट(Loco Pilot)आणि असिस्टंट लोको पायलट्सना (Assistant loco pilot) रनिंग अलाऊंस (Running Allowance) वाढवून मिळणार आहे.
आगामी निवडणुकांचं लक्ष्य ठेवत मागील काही दिवसांपासून मोदी सरकार धमाकेदार घोषणा करत आहेत. सवर्णांना आरक्षण, कराच्या मर्यादेमध्ये सवलतीची शक्यता आणि आता सरकारी कर्मचार्यांना मोदी सरकार एक मोठ गिफ्ट घेऊन आलं आहे. मीडीया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार रेल्वे कर्मचार्यांना रनिंग अलाऊंस दुप्पट मिळणार आहे. यामुळे कर्मचार्यांच्या वेतनामध्ये हजारोंची वाढ होणार आहे. रेल्वेच्या लोको पायलट(Loco Pilot)आणि असिस्टंट लोको पायलट्सना (Assistant loco pilot) रनिंग अलाऊंस (Running Allowance) वाढवून मिळणार आहे.या रेल्वे कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगानुसार हे रनिंग अलाऊंस मिळणार आहेत.
किती असेल रनिंग अलाऊंस?
गार्ड्स, लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट्स यांना रनिंग अलाऊंस 255 रू प्रति 100 किमी आहे तो आता दुप्पट म्हणजे 520 रुपये होईल. रेल्वेच्या इतरकर्मचार्यांना
जुलै 2017 मध्ये अलाऊंस देण्यात आला होता. मात्र रनिंग स्टाफ बाबत रेल युनियन आणि रेल्वे बोर्ड यांच्यामध्ये वाद सुरू होता. 2016 च्या अलाऊंस कमिटीच्या शिफारसीनुसार, जून 2018 मध्ये रेल्वे बोर्डाने रनिंग अलाऊंस दुप्पट करण्याचे आदेश दिले आहेत.रेल्वे बोर्डाच्या अलाऊंस वाढवून देण्याच्या या निर्णयावर मंत्रालयाकडूनही याच महिन्यात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महिलांना 'या' पदांवर नोकरी देण्यास रेल्वे प्रशासनाचा नकार
रेल्वे बोर्ड आणि मंत्रालयातून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर मेल एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी अशा सुपरफास्ट ट्रेन आणि मालगाडीच्या लोको पायलट आणि गार्ड्सना फायदा होणार आहे. यामुळे लोको पायलट आणि गार्ड्सना दरमहा 12,000 ते 25,000 रूपये अधिक पगार मिळेल.