Coronavirus Lockdown नंतर रेल्वे प्रवासाबाबत प्रोटोकॉल जारी केल्याच्या बातम्या अफवा; भारतीय रेल मंत्रालयाकडून खुलासा
अद्याप पुन्हा रेल्वेसेवा कधी आणि कशी सुरू केली जाणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला देशभर लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊन दरम्यान राज्यांचा सीमा बंद करत देशांर्तगत रेल्वे सेवा बंद केली. भारतामध्ये 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन आता वाढवला जाणार का? याचं अद्याप ठोस उत्तर केंद्र सरकारकडून देण्यात आलं नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट्स बातम्यांचे चुकीचे तर्क वितर्क लावत भारतीय रेल्वेच्या पोस्ट लॉकडाऊन प्रोटोकॉलबद्दल बातम्या देत असल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र काल (9 एप्रिल) भारतीय रेल्वेकडून आणि आज PIB कडूनही भारतामध्ये लॉकडाऊन नंतरचे रेल्वे प्रवासाचे प्रोटोकॉल बाबतच्या बातम्या तथ्यहीन आणि अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. अद्याप पुन्हा रेल्वेसेवा कधी आणि कशी सुरू केली जाणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
केंद्र सरकारने 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. आता जसा हा 21 दिवसांचा काळ संपत आहे तशी भारताच्या विविध भागांमध्ये अडकून पडलेली मंडळी पुन्हा आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी धडपड करत आहेत. अनेकांनी पायी चालत जाण्याचाही मार्ग निवडला. देशातील अशाच परिस्थितीचा फायदा घेत सोशल मीडियामध्ये रेल्वेप्रवासाबद्दलचा प्रोटेकॉल, ट्रेन सुरू होण्याच्या तारखा, स्थान याबाबत काही मेसेज फिरत आहेत. मात्र या बातम्या अधिकृत नसल्याचं रेल्वेने स्पष्ट केले आहे.
Ministry of Railways चा खुलासा
देशभरात मोठ्या संख्येने मेट्रो शहरांमध्ये नागरिक स्थलांतरित झाले आहे. आता लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या भीतीने अनेक उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक मजुरांनी मूळ गावी जाणं पसंत केलं आहे. मात्र सार्या राज्यांच्या सीमा सील असल्याने अनेकांना रिलीफ कॅँपमध्येच रहावं लागत आहे. पण आता त्यांना परतीचे वेध लागल्याने रेल्वे कधी सुरू होतेय? लॉकडाऊन कधी संपतोय असं अनेकांना झालं आहे.