पद्मश्री विजेत्या प्राध्यापिका Rohini Godbole यांना फ्रान्स सरकारचा मानाचा National Order Of Merit पुरस्कार

मूळच्या पुण्याच्या असणार्‍या रोहिणी गोडबोले यांना भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्पांसोबत मूलभूत विज्ञान संशोधनात महिलांचे प्रमाण वाढावे, यासाठी दिलेल्या योगदानासाठी या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Prof Rohini Godbole (Photo Credits: Twitter/IISCBangalore)

फ्रान्स सरकारने भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि प्राध्यातिका रोहिणी गोडबोले (Rohini Godbole ) यांचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट' हा बहुमानाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मूळच्या पुण्याच्या असणार्‍या रोहिणी गोडबोले यांना भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्पांसोबत मूलभूत विज्ञान संशोधनात महिलांचे प्रमाण वाढावे, यासाठी दिलेल्या योगदानासाठी या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अभिमानास्पद! सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'Global Teacher Award' जाहीर.

प्राध्यापिका गोडबोले या पद्मश्री पुरस्कार विजेत्या आहेत. सध्या त्या बेंगळुरू येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'मधील (आयआयएस्सी) 'सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स'मध्ये कार्यरत आहेत. 1995 साली त्यांनी या संस्थेत असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करण्यास सुरू केले. आयआयटी मुंबई मधून मास्टर्स तर theoretical particle physics मध्ये पीएचडी अमेरिकेच्या स्टेट युनिवर्सिटी ऑफ न्यू यॉर्क मध्ये पीएचडी करण्यासाठी गेल्या.

फ्रान्सची राष्ट्रीय संशोधन संस्था असणाऱ्या 'सीएनआरएस'च्या 'इंडो-फ्रेंच लॅबोरेटरी इन थिअरॉटिकल हाय एनर्जी फिजिक्स'सोबत त्यांनी मूलभूत संशोधनाचे प्रोजेक्ट्स केले आहेत. 'सीएनआरएस आणि आयआयएस्सी'च्या संयुक्त संशोधन प्रकल्पांनी मोठे यश देखील संपादन केले आहे.

एनसीपी नेते आणि राज्यातील महाविकास आघाडी मधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रोहिणी गोडबोले यांचे ट्वीट करत अभिनंदन  केले आहे.