Starbucks CEO: भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, भारतीय वंशाचे Laxman Narasimhan स्टारबक्सचे नवे CEO
सध्या हॉवर्ड शुल्झ हे स्टारबक्सच्या सिईओ पदाचा भार सांभाळतात तरी भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन लवकरच स्टारबक्सच्या सिईओ पदावर रुजु होणार आहेत.
कॉफीचा जगप्रसिध्द ब्राण्ड स्टारबक्समध्ये (Starbucks) जावून एकदा तरी कॉफी (Coffee) प्यावी आणि तिथल्या कपावर आपलं नावं नोंदवण्यात यावं असं प्रत्येक सर्वसामान्य भारतीयाचं एक स्वप्न असतं. पण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं भारतीय लेकाने फक्त स्टारबक्सच्या कपावरच नाही तर थेट स्टारबक्सच्या सीईओ (CEO) म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आपलं नाव नोंदवलं आहे. भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन (Laxman Narasimhan) यांची कॉफी कंपनी स्टारबक्सचे नवीन (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मण नरसिंहन यांचं वय 55 वर्ष असुन भारतीय लक्ष्मण हे मूळचे पुण्याचे (Pune) रहिवासी आहेत. त्यांनी त्याची पदवी (Graduation) शिक्षण पुणे युनिवर्सिटीतून (Pune) पुर्ण केलं असुन पोस्ट ग्रॅज्यूअशन (Post Graduation) जर्मनीतून (Germany) पुर्ण केलं आहे.
महेंद्रा ग्रुपचे (Mahindra Group) प्रमुख असलेले आनंद महेंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील स्टारबक्सच्या (Starbucks) या निर्णयावर ट्वीट (Tweet) केलं आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या CEO ची नियुक्ती हा आता न थांबवता येणारा ट्रेंड (Trend) आहे. आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर भारतीय नेत्तृत्व हे सुरक्षित नेतृत्व समजल्या जात आहे, ह्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रीया आनंद महेंद्रा यांनी दिली आहे. (हे ही वाचा:- Adar Poonawalla and Bill Gates: कोव्हिशील्ड मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची अदर पुनावालांसह बिल गेट्स यांना नोटीस)
नव्याने स्टारबक्स सीईओ पदाचा पदभार सांभाळणारे लक्ष्मण नरसिंहन हे यापूर्वी रेकिटचे (Reckitt) सीईओ (CEO) होते, जे ड्युरेक्स कंडोम (Durex Condoms), एन्फामिल बेबी फॉर्म्युला (Enfamil baby formula) आणि म्युसिनेक्स कोल्ड सिरप (Mucinex cold syrup) देखील बनवतात. लक्ष्मण नरसिंहन यांनी यापूर्वी पेप्सिकोमध्ये (PepsiCo) जागतिक मुख्य व्यावसायिक अधिकारी म्हणून काम केले होते. सध्या हॉवर्ड शुल्झ (Howard Schultz) हे स्टारबक्सच्या सिईओ पदाचा भार सांभाळतात तरी लक्ष्मण नरसिंहन लवकरच स्टारबक्सच्या सिईओ पदावर रुजु होणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)