Indian Navy Naval Ensign: नौदलाच्या नव्या झेंड्याची प्रेरणा शिवरायांच्या राजमुद्रेमधून; छत्रपती शिवाजी महाराजांना नवा झेंडा अर्पित - PM Narendra Modi
ते हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी आज नौदलाच्या (Indian Navy) नव्या झेंड्यांचं अनावरण केले आहे. आज नौदलाला मिळाला नवा झेंडा महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना अर्पण करण्यात आला आहे. केरळ मध्ये पहिली स्वदेशि कोची शिपायार्ड लिमिटेडची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) दाखल झाली. त्यावेळी हा नौदलाच्या नव्या झेंड्याचं अनावरही झालं.
भारतीय नौदलाच्या नव्या झेंड्यावर एका भागात तिरंगा आहे तर दुसर्या बाजूला नौदलाचं चिन्ह आहे. शिवरायांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेतली असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शिवरायांनी आरमार उभारून नौदलाचा विकास केला होता त्याची आज त्यांनी बोलताना आठवण करू दिली आहे. हे देखील नक्की वाचा: New Naval Ensign Of Indian Navy: पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलाच्या नव्या चिन्हाचं अनावरण, पहा भारतीय नौदलाचं नवं चिन्ह.
छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचं सामर्थ्य ओळखून शत्रूला धूळ चारणाऱ्या सशक्त नौदलाची निर्मिती केली. भारतीय नौदलाच्या इतिहासातून गुलामगिरीचं एक निशाण कायमचं नष्ट होत असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय कार्याला समर्पित असणारा नौदलाचा नवा ध्वज गर्वानं फडकणार आहे असा विश्वासही बोलून दाखवला आहे.
भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. ते हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि श नो वरुण: हे ब्रीद लिहिलेलं आहे. याचा अर्थ 'जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो' असा आहे.