Singer Renu Nagar Hospitalised: Indian Idol फेम गायिका रेणू नागर च्या बॉयफ्रेंडचा विष खाल्ल्याने मृत्यू झाल्याचं वृत्त कळताच प्रकृती बिघडली; अत्यावस्थ स्थितीत ICU मध्ये दाखल- रिपोर्ट्स

ही बातमी रेणूला समजताच तिची तब्येत बिघडली आहे. रवीच्या निधनाच्या वृत्ताने रेणूला जबर धक्का बसला.

रेणु नागर (Image Credit: Instagram)

इंडियन आयडॉल (Indian Idol) फेम गायिका रेणू नागर हिच्या बद्दल एक धक्कादायक आणि तितकीच तिच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. मीडीया रिपोर्टनुसार, राजस्थानमधील अलवर भागात राहणारी रेणू नागर  (Renu Nagar) हीचा बॉयफ्रेंड रवी नट (Ravi Nut) यांचा विषारी पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. ही बातमी रेणूला समजताच तिची तब्येत बिघडली आहे. रवीच्या निधनाच्या वृत्ताने रेणूला जबर धक्का बसला. ती खाली पडली. दरम्यान रेणूला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

मीडीया रिपोर्टनुसार रवि आणि रेणू महिन्याभरापूर्वी पळून गेले होते. त्यांनंतर रेणूच्या वडीलांनी रवीवर तिचं ब्रेन वॉशकडून तिला पळवून नेल्याचा आरोप करत पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती. दरम्यान 5 दिवसांपूर्वी दोघेही परतले होते. अशामध्ये आता रवीच्या निधनाची बातमू समोर आली आहे. दरम्यान ही आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज असला तरीही त्यामागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. रवीच्या कुटुंबाकडून त्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

रवी हा रेणूला तिच्या घरी तबला शिकवण्यासाठी येत असे. त्याद्वाराच त्यांची मैत्री झाली. पुढे प्रेम जडले. दरम्यान रवीचे यापूर्वी एक लग्न झाले. त्याला दोन मुलं देखील आहेत.