Indian Digital Currency: आरबीआयकडून भारतीय डिजिटल रुपया लॉंच, आर्थिक व्यवहारासाठी डिजिटल रुपया वापरण्याची मुभा

१ डिसेंबर पासून डिजिटल करंसी वापरण्याची मुभा देण्यात आली आहेत तरी आरबीआय कडून काही विशेष नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत.

RBI | (File Image)

रिजर्व बॅंक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank Of India) भारताचा स्वत:चा हक्काचा डिजिटल रुपया लॉंच (Digital Rupees Launch) करण्यात आला आहे. तरी देशवासियांना आता आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजिटल करंसीचा (Digital Currency) वापर करता येणार आहे. १ डिसेंबर पासून डिजिटल करंसी वापरण्याची मुभा देण्यात आली आहेत तरी आरबीआय कडून काही विशेष नियम व अटी (RBI Rules and Guidelines)  घालून देण्यात आल्या आहेत. देशातील एकूण आठ बॅंकांना डिजीटल रुपया (Digital Rupees) जारी करता येईल तरी सध्या पहिल्या टप्प्यात यापैकी चार बॅंकांना ही मुभा देण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँक (State Bank Of India), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), येस बँक (Yes Bank) आणि आयडीएफसी (IDFC First Bank) फर्स्ट बँक या बैकांना १ डिसेंबर पासून डिजिटल करंसी जारी करण्यात येईल. तर पुढील काही दिवसात बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda), युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) या चार म्हणजे देशभरातील एकूण आठ बॅंकांना डिजिटल करंसीने व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

सध्या देशभरातील फक्त चार शहरांमध्ये डिजिटल करंसी लॉंच (Digital Currency Launch) करण्यात आली आहे. यांत मुंबई (Mumbai), नवी दिल्ली (New Delhi), बंगळूरु (Bangalore) आणि भुवनेश्वरचा (Bhubaneswar) समावेश आहे. तर येणाऱ्या काहीच दिवसात ९ शहरांमध्ये डिजिटल करंसीने व्यवहार करण्यास मुभा मिळेल. यांत अहमदाबाद (Ahmedabad), गंगटोक (Gangtok), गुवाहाटी (Guwahati), हैदराबाद (Hyderabad), इंदूर (Indore), कोची (Kochi), लखनौ (Lucknow), पाटणा (Patna) आणि शिमला (Shimla) या शहरांचा समावेस असेल. म्हणजे लवकरच देशभरात एकुण १३ शहरांमध्ये डिजीटल करंसीचा वापर करण्यात येणार आहे. तरी ता संपूर्ण भारताला देसी डिजिटल करंसीची प्रतिक्षा आहे. (हे ही वाचा:- GST Collections for November: नोव्हेंबरमधील जीएसटी महसूल संकलनाचा आकडा 1.46 लाख कोटीवर; गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 10.9 टक्के वाढ)

 

 

डिजीटल करंसीला (Digital Currency) भारतीय नागरिक (Indian Citizen) कसा प्रतिसाद देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी देशभरातील चार मेट्रो सिटीमध्ये (Metro City) ही डिजीटल करंसी लॉंच (Digital Currency Launch) करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आर्थिक व्यवहारासाठी या चलनाचा अधिकाधिक वापर होणं अधिक अपेक्षित आहे. लोकांचा प्रतिसाद बघता रिजर्व बॅंकेकडून यासंबंधीत पुढील निर्णय घेतला जाईल.