Coronavirus: लडाख मधील भारतीय सैन्य दलाच्या जवानाला वडिलांसहित कोरोना ची लागण
या जवानांच्या वडिलांना सुद्धा ही लागण झाली आहे,
कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या विळख्यात आता भारतीय सैन्य दलाचा सुद्धा एक जवान अडकून पडला आहे. मंगळवार, 17 मार्च रोजी लेह आणि लडाख मध्ये कार्यरत असणाऱ्या लडाख स्काऊट्स (Ladakh Scouts) मधील एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या जवानांच्या वडिलांना सुद्धा ही लागण झाली आहे, प्राप्त माहितीनुसार जवानाचे वडील धार्मिक सहलीसाठी नुकतेच इराण (Iran) ला गेले होते, तेथून परतत असताना ही लागण झाली आहे. दरम्यान, संबंधित जवानावर उपचार सुरु करण्यात आले असून खबरदरीचा पर्याय म्हणून जवानाच्या पत्नी आणि कुटुंबाला वेगळे ठेवण्यात आले आहे. Corona In Maharashtra: पुणे शहरात कोरोना व्हायरसची आणखी एकाला लागण; राज्यात रुग्णांचा आकडा 42
प्राप्त माहितीनुसार, संबंधित जवान हा 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत सुट्टीवर होता,त्याच्या वडिलांना इराण मधून परतल्यावर कोरोनाची लागण झाल्याचे समजताच, 7 मार्च रोजी सुरक्षेसाठी या जवानाला सुद्धा विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते, तर 17 मार्च रोजी या जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी सुद्धा भारतीय नौदलातील पायलट महिलेला ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने चाचणीसाठी कोलकाता येथील रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.
ANI ट्विट
दरम्यान, सद्य घडीला भारतातील कोरोनाचा फैलाव हा लेव्हल 2 मध्ये आहे तेव्हा 3 पर्यंत हा व्हायरस पसरल्यास वुहान प्रमाणेच भारतात सुद्धा लॉक डाऊन करण्याची परिस्थिती येऊ शकते, मात्र असे होऊ नये यासाठी सरकारतर्फे मोठी पाऊले उचलली जात आहेत. भारतात सध्या कोरोनाचे 148 रुग्ण असून यापूर्वी दिल्ली, कलबुर्गी आणि काल, 17 मार्च रोजी मुंबईत सुद्धा एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.