Indian Army Helicopter Crash: भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त, कठुआ येथील धरणात कोसळले

अपघात झाल्याने हे हेलिकॉप्टर रंजीत सागर (Ranjit Sagar) धरणामध्ये कोसळले.

Indian Army Helicopter Crash | (Photo Credits: ANI)

भारतीय लष्कराच्या एका हेलिकॉप्टरला (Indian Army Helicopter Crash) जम्मू कश्मीरमधील (Jammu and Kashmir) कठुआ (Kathua) भागात अपघात झाला आहे. अपघात झाल्याने हे हेलिकॉप्टर रंजीत सागर (Ranjit Sagar) धरणामध्ये कोसळले. अपघाताचे (Helicopter Crash) कारण समजू शकले नाही. तसेच, या हेलिकॉप्टरमध्ये किती लोक प्रवास करत होते आणि ते लोक नेमके कोण होते, ते कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी निघाले होते? याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान अपघाताची माहिती कळताच एनडीआरएफचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज (3 ऑगस्ट) सकाळी साधारण 10.20 वाजता भारतीय लष्कराच्या 254 आर्मी AVN स्क्वॉड्रननं हेलिकॉप्टर कँटममधून हवेत झेपावले. दरम्याण, धरण परिसरात हे हेलिकॉप्टर कमी उंचीवरुन परिसराची पाहणी करत होते. या वेळी हेलीकॉप्टर जमीनीकडे झेपावले आणि धरणात कोसळले. अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. अपघाताच्या कारणाचा शोध सुरु आहे. तसेच, मदत आणि बचावकार्यही सुरु आहे.

ट्विट

दरम्यान, या वर्षात लष्कराच्या हेलिकॉप्टरला घडलेला हा दुसरा अपघात आहे. या वर्षाच्या अगदी सुरुवातीसही भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. यात असलेल्या दोन पायलटपैकी एकाचा मृत्यू झाला होता.