India-China Tensions: गलवान खोर्यातील संघर्षानंतर लद्दाख मध्ये आभाळात घिरट्या घालताना दिसलं वायुसेनेचं लढाऊ विमान (Watch Video)
आता भारताच्या लेह प्रांतामध्येही फायटर जेट्स आभाळात फिरताना दिसली आहेत.
गलवान खोर्यामध्ये (Galwan Valley)भारतीय लष्कर आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता लद्दाख मध्ये हवाई क्षेत्रामध्ये काही घडामोडी दिसायला सुरूवात झाली आहे. सध्या LAC वर भारतीय लष्कर अलर्ट झालं आहे. सीमेवर वातावरण तणावग्रस्त झाल्यानंतर वायुसेनेने लडाऊ विमान पाठवण्यात आली आहेत. आता भारताच्या लेह प्रांतामध्येही फायटर जेट्स आभाळात फिरताना दिसली आहेत. त्याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.
वृत्त संस्था ANI कडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये भारतीय वायुसेनेचं लढाऊ जेट उडताना दिसत आहे. भारत- चीन यांच्यामध्ये वाढता तणाव पाहता येथे अनेक घडामोडी होत आहे. दरम्यान गलवान खोर्यातून हिंसक झटापटीमुळे आता तणाव वाढला आहे.
सोमवार (22 जून ) दिवशी दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काल 11 तास झालेल्या बैठकीनंतर आता दोन्ही दलाकडून सैन्य मागे घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. दरम्यान भारतीय-चीन सैनिकांमध्ये झालेल्या झडपीमध्ये 20 जवान शहीद झाले होते. 76 जण जखमी झाले आहेत. लष्करी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांची प्रकृती स्थिर आहे. लेह मधील इस्पितळामध्ये 18 जवान दाखल आहेत तर अन्य 58 जवानांवर इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
15 जूनला गलवानच्या घाटीत सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान यामध्ये एक वरिष्ठ अधिकारी देखील शहीद झाला आहे. दरम्यान भारतीय सैनिकांपैकी कुणीही चीनी सैन्याच्या ताब्यात नसल्याचं सांगण्यात आलं आहे.