India A vs Oman, 12th Match, Group B 1st Inning Scorecard: ओमानने टीम इंडिया अ संघाला दिले 141 धावांचे लक्ष्य, पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड पहा

ओमान संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 140 धावा केल्या. ओमानकडून मोहम्मद नदीमने सर्वाधिक 41 धावांची खेळी खेळली. मोहम्मद नदीमशिवाय हम्माद मिर्झाने नाबाद 28 धावा केल्या.

India A vs Oman, 12th Match, Group B 1st Inning Scorecard: ओमानने टीम इंडिया अ संघाला दिले 141 धावांचे लक्ष्य, पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड पहा
Photo Credit - BCCI

India A National Cricket Team vs Oman National Cricket Team, ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024 Match Scorecard:   ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स एशिया कप 2024 चा 12 वा सामना आज भारत अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना अल अमेरत येथील अल अमेरत (Al Amerat) क्रिकेट मैदानावर (मिनिस्ट्री टर्फ १) (Al Amerat Cricket Ground, Ministry Turf 1) खेळला जात आहे. भारत अ संघानेही या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भारत अ संघाने दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोघांमध्ये विजयाची नोंद झाली आहे. याशिवाय भारत अ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.  (हेही वाचा  -  IND A vs OMN, Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024 Live Streaming: इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत आज भारत अ आणि ओमान आमनेसामने, पहा येथे सर्वोत्तम ड्रीम 11 संघ )

या सामन्यात ओमानचा कर्णधार जतिंदर सिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ओमानच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाचे तीन फलंदाज अवघ्या 33 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.

पाहा पोस्ट -

आकिब खानने भारत अ संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. भारत अ संघाकडून आकिब खान, रसिक दार सलाम, निशांत सिंधू, रमणदीप सिंग आणि रविश्रीनिवासन साई किशोर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. हा सामना जिंकण्यासाठी भारत अ संघाला 20 षटकात 141 धावा करायच्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2024 09:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).