Increment In Pension By EPFO: नव्या वर्षात EPFO पेन्शन धारकांना वाढीव पेन्शन मिळणार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा मोठा निर्णय
येत्या वर्षापासून ईपीएफओ पेंशन धारकांना वाढीव पेंशन देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती देणार एक पत्रक काढत ईपीएफओकडून माहिती देण्यात आली आहे.
तुम्ही ईपीएफओ पेंशन धारक आहात? मग ही गुड न्युज तुमच्यासाठी आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेचं ईपीएफओने पेंशन धारकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या वर्षापासून ईपीएफओ पेंशन धारकांना वाढीव पेंशन देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती देणार एक पत्रक काढत ईपीएफओकडून माहिती देण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ईपीएफओने ही वाढीव पेंशन देण्याचा निर्णय घेतला आहे. तरी ही वाढीव पेंशन सगळ्याचं ईपीएफओ धारकांना देण्यात येणार नसुन काही ठराविक धारकांनाचं या वाढीव पेंशनचा लाभ घेता येणार आहे. तरी नेमके हे पेंशन धारक कोण आणि या वाढीव पेंशन बाबत नेमक्या काय अटी आणि नियमावली याबाबतचीच माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.
EPFO कडून जारी करण्यात आलेल्या या पत्रकानुसार 31 ऑगस्ट 2014 पर्यंत निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही. 1 सप्टेंबर 2014 रोजी किंवा त्यानंतर EPS शी जोडलेल्या पेंशन धारकांना अधिक पेन्शन मिळणार आहे. यासोबतच या पत्रकात कोणते एपीएफओ कर्मचारी अधिक पेन्शन मिळण्यास पात्र आहेत. तसेच या वाढीव पेंशनचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि या वाढीव पेंशनचा लाभ कसा मिळवायचा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. (हे ही वाचा:- New Rules in 2023: क्रेडीट कार्ड, बँक लॉकर, आधार-पॅन लिंक यांसह अनेक नियमांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून महत्त्वाचे बदल, घ्या जाणून)
या परिपत्रकानुसार EPFO ने म्हटले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी EPS मध्ये 5000 रुपये किंवा 6500 रुपयांच्या पगार मर्यादेपेक्षा जास्त पेन्शन मिळवण्यासाठी योगदान दिले आहे तेच या अंतर्गत लाभांसाठी पात्र मानले जातील. म्हणजेचं ज्या कर्मचाऱ्यांनी (EPF) योजनेंतर्गत जास्त पगाराचे योगदान दिले आहे आणि सेवानिवृत्तीपूर्वी उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडला होता केवळ त्याचं ईपीएफओ धारकांना या वाढीव पेंशनचा लाभ घेता येणार आहे.