Coronavirus Update In India: 525 नव्या रुग्णांसह भारतातील कोरोना बाधितांची संख्या 3072 वर
गेल्या 24 तासांत भारतात 525 नवे रुग्ण आढळले असून आता कोरोना बाधितांची संख्या 3072 वर गेली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून भारतातील (India) स्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे. नव्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 525 नवे रुग्ण आढळले असून आता कोरोना बाधितांची संख्या 3072 वर गेली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या 3072 रुग्णांमध्ये 2784 सक्रिय केसेस असून 213 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 75 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या जवळपास 30 टक्के घटना या दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथील तबलीघी जमातच्या (Nizamuddin Tablighi Jamaat) कार्यक्रमाशी संबंधित आहेत.
आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली, यामध्ये देशातील कोरोना व्हायरसच्या परिस्थिती बाबत माहिती देण्यात आली. मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सध्या 17 राज्यांमधून एकूण 1023 कोरोना व्हायरसची प्रकरणे ही तबलीगी जमातशी संबंधित आहेत. आता पर्यटक व्हिसावर भारतात येऊन तबलीगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या 960 परदेशी लोकांबद्दल, केंद्रीय गृह मंत्रालयाने त्वरित हद्दपारीचा निर्णय घेतला आहे.
ANI चे ट्विट:
हेदेखील वाचा- Coronavirus: मुंबईत आज कोरोनाचे नवे 52 रुग्ण आढळले तर 4 जणांचा मृत्यू, महापालिकेने दिली माहिती
सद्य स्थितीत भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 3072 झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकांनी घराबाहेर पडू असा सल्ला वारंवार प्रशासनाकडून दिला जात आहे.
तर दुसरीकडे मुंबईत कोरोना व्हायरसचे 52 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. कोरोना व्हायरच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून मदत केली जात आहे. तसेच राजेश टोपे यांनी आपल्याकडे मुबलक प्रमाणात मास्क आणि व्हेंटिलेटर्सची संख्या असल्याचे सांगितले आहे. मात्र तरीही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून त्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तर आज मुंबईत कोरोनामुळे मृतांचा आकडा 22 वर पोहचला आहे.