Income Tax Return Filing New Date: आर्थिक वर्ष 2018-19 चा ITR भरण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
सुरूवातीला 31 मार्च वरून 31 जुलै आणि आता 31 जुलै वरून 30 सप्टेंबर पर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही तिसर्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ आहे.
कोरोना संकटकाळामध्ये केंद्र सरकारने यंदा कर दात्यांना एक मोठा दिलासा आहे. यामध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने 2018-19 चा आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. पूर्वी 31 जुलै ही असलेली अंतिम तारीख आता 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही यंदा इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) दाखल केला नसेल तर तो तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत भरू शकता.
दरम्यान काल ट्वीटरच्या माध्यमातून माहिती देताना, कोरोना व्हायरस स्थितीच्या पार्श्वभूमीवर आता यंदाचा आयटीआर दाखल करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देत असल्याचं सांगत त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे अशी माहिती दिली आहे. सुरूवातीला 31 मार्च वरून 31 जुलै आणि आता 31 जुलै वरून 30 सप्टेंबर पर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही तिसर्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ आहे.
Income Tax India Tweet
सध्या देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे सारेच आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले आहे. देशामध्ये आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र आता हळूहळू नियमांमध्ये शिथिलता देखील देण्यात आली आहे. बॅंकेचे देखील व्यवहार शक्यतो ऑनलाईन करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)