Monsoon Forecast Update: महाराष्ट्र सहित संपुर्ण भारतात पुढील पाच दिवस पावसाचे, 22 सप्टेंबर नंंतर जोर ओसरणार- IMD
एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांंनी दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्र सहित संपुर्ण भारतात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे असणार आहेत.
हवामान विभागाचे उपमहासंचालक (IMD) के. एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांंनी दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्र सहित संपुर्ण भारतात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे असणार आहेत. आज 20 सप्टेंबर पासुन ते गुरुवार, 24 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र (Maharashtra) , गोवा (Goa), गुजरात (Gujrat), कर्नाटक (Karnataka) , मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सहित संपुर्ण देशभर पाऊस कायम राहणार आहे यात 22 सप्टेंबर नंंतर दक्षिणेकडे पावसाचा जोर ओसरेल तसेच महाराष्ट्रात व अन्य राज्यातही तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाउस होईल असे समजत आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. Mumbai Weather Forecast: मुंबई व ठाणे परिसरात सोमवार व मंगळवार साठी अतिवृष्टीचा इशारा जारी; 19-22 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा जोर वाढणार
दुसरीकडे कर्नाटक मध्ये काही दिवसापासुन जोरदार पाऊस सुरु आहे. अशामुळे अनेक जिल्ह्यात पुरपरिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे. रस्त्यांंवर पाणी साचलेले आहे, घरात शिरलेय, अशावेळी बचाव कार्यासाठी कालपासुन एनडीआरएफ ची पथकंं सुद्धा कार्यरत आहेत. आता पुढील पाच दिवस कायम राहिल्यास ही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे ज्या पार्श्वभुमीवर बचावकार्याची टीम तैनात ठेवण्यात आली आहे.
K.S. Hosalikar Tweet
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कोकण आणि मुंंबई मध्ये अधुन मधुन पावसाच्या सरी बरसत आहेत मात्र आज रात्रीपासुन पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीवर सोसाटयाचा वारा वाहण्याीच शक्यता असल्याने समुद्राजवळ जाऊ नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत.