तुमच्या घराजवळील Aadhar सेवा केंद्राची माहिती कशी मिळवाल, 'या' सोप्प्या मार्गाचा वापर करा

आधार कार्ड (Aadhar Card) संबंधित सेवा त्यांच्या केंद्रातच उपलब्ध करुन दिल्या जातात. तर एखाद्या वेळेस तुम्हाला मोबाईल क्रमांक, फोटो किंवा पत्ता बदली करायचा असल्यास तुम्ही ती ऑनलाईन ही करु शकता.

तुमच्या घराजवळील Aadhar सेवा केंद्राची माहिती कशी मिळवाल, 'या' सोप्प्या मार्गाचा वापर करा
Aadhar Card (Photo Credits-Twitter)

आधार कार्ड (Aadhar Card) संबंधित सेवा त्यांच्या केंद्रातच उपलब्ध करुन दिल्या जातात. तर एखाद्या वेळेस तुम्हाला मोबाईल क्रमांक, फोटो किंवा पत्ता बदली करायचा असल्यास तुम्ही ती ऑनलाईन ही करु शकता. पण त्यामध्ये ही समस्या येत असेल तर तुम्हाला मात्र आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागणार आहे. परंतु तुमच्या घराजवळ आधार केंद्र कुठे आहे ते तुम्हाला शोधायचे असल्यास त्यासाठी एक सोप्पा मार्ग आहे.(Pension साठी Life Certificate ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी 'या' सोप्प्या स्टेप्सचा वापर करा)

घराजवळील आधार सेवा केंद्राची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही हेल्पलाईन क्रमांक 1947 वर कॉल करु शकता. आधार हेल्पलाईन क्रमांकावर तुम्हाला विविध भाषेत माहिती दिली जाणार आहे. UIDAI कडून करण्यात आल्या एका ट्वीटमध्ये असे म्हटले गेले आहे की, आधार कार्ड संबंधित कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर स्थानिक भाषेत मिळवू शकता. त्याचसोबत mAaadhar App च्या माध्यमातून ही तुम्हाला नजीकच्या आधार केंद्राची माहिती मिळू शकणार आहे.(How To Download Digital Copy Of Aadhar Card: तुमचं आधार कार्ड हरवलंय का? 'या' पद्धतीने घरात बसून मिळवू शकता डिजिटल कॉपी; जाणून घ्या सोप्या टीप्स)

जर तुम्ही अॅन्ड्रॉइड युजर असल्यास गुगल प्ले स्टोरच्या माध्यमातून mAadhaar App डाऊनलोड करु शकता. याच्या सहाय्याने अन्य पद्धतीची सुविधा ही मिळवू शकता. ऐवढेच नाही तर नजकीच्या आधार केंद्राची ही माहिती दिली जाणार आहे. दुसरा मार्ग म्हणजे तु्म्ही UIDAI च्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही केंद्राची माहिती मिळवू शकताय यासाठी तुम्हाला uidaigov.in वर लॉगइन करावे लागणार आहे. येथे गेल्यास My Aadhar टॅब नुसार Located an Enrolment Center च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे. तेथे तुम्हाला पिन कोडसह अन्य ऑप्शनच्या मदतीने माहिती मिळवता येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2020 08:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).