How is Satta Matka Played: सट्टा मटका अवैध मग कसा खेळला जातो? जाणून घ्या बद्दल सरं काही
हा खेळ न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज मधील कापसांच्या दरावर होता. यामध्ये बाजार उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या दरांवर भविष्यवाणी केली जात होती.
सट्टा मटका (Satta Matka) किंवा सट्टा किंग हा एक प्रकारचा जुगार आहे. लॉटरीच्या स्वरूपामध्ये तो खेळला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पासून हा खेळ खेळायला सुरूवात झाली होती. 1950 च्या दशकामध्ये त्याची सुरूवात झाली पण पुढे यावर बंदी आली. मात्र र्क लोकप्रिय खेळ असल्याने लोकांना त्याबद्दल उत्सुकता आहे. भारतामध्ये एकूणच जुगार खेळणं हे बेकायदेशीर आहे. मात्र अनेक लोकं आपलं नशीब या खेळामध्ये आजमावत असतात. काही अंकांवर नशिबाचा खेळ जिंकणार्याला मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळत होती. आज देशात सट्टा अवैध आहे.
1950 च्या दशकामध्ये हा खेळ 'आकडा जुगार' म्हणून ओळखला जात होता. हा खेळ न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज मधील कापसांच्या दरावर होता. यामध्ये बाजार उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या दरांवर भविष्यवाणी केली जात होती.
सट्टा मटका ची लोकप्रियता
रतन खत्री याने सुरू केलेल्या मटका ला सुरू करताच त्याला लोकप्रियता मिळत गेली. त्यावेळी हा खेळ 0 ते 9 पर्यंत अंकांच्या निवडीवर होता. या अंकांना कागदाच्या तुकड्यांवर लिहलं जातं असे आणि तो कागद मटक्यामध्ये टाकला जात होता. नंतर एक व्यक्ती त्या मटक्यामधून 3 अंक काढत होती. त्यामधून एक विनिंग कॉम्बिनेशन बनत होते.
खेळाला पारदर्शी आणि निष्पक्ष बनवण्यासाठी विनिंग कॉम्बिनेशन हे सार्वजनिक ठिकाणी काढली जात होती. यामुळे मोठी गर्दी आकर्षित केली जात होती. ड्रॉ च्या दिवसातून अनेकवेळा काढले जात होते. यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साह राहत होता. विजेत्यांना मोठी बक्षीसं मिळत होती. त्यामुळे लोकांना याचं आकर्षण होतं.
वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
आमच्या वाचकांसाठी, LatestLY यावर जोर देते की सट्टेबाजी आणि जुगार खेळणे भारतात कठोरपणे प्रतिबंधित आहे. आम्ही सर्वांनी बेटिंग आणि जुगाराबाबत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करतो. सरकारी वेबसाइट्सद्वारे बेकायदेशीर क्रियाकलापांची जाहिरात ही एक गंभीर समस्या आहे जी या साइट्स सुरक्षित करण्यासाठी आणि सार्वजनिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी करते.