South Korea Plane Crash: किती धोकादायक असते विमानाला पक्षाची धडक? कसं होऊ शकतं प्लॅन क्रॅश?
विमान दुर्घटनेत 181 प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानतळावर उतरताना विमान सरकलं ते अनियंत्रित झालं आणि भिंतीला धडकलं. त्यानंतर विमानाने पेट घेतला.
South Korea Plane Crash: दक्षिण कोरियामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली. विमान दुर्घटनेत 181 प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानतळावर उतरताना विमान सरकलं ते अनियंत्रित झालं आणि भिंतीला धडकलं. त्यानंतर विमानाने पेट घेतला. घटना अंगावर थरकाप आणणारी आहे. हॉलीवूड चित्रपटातही एवढही भयानक घटना दाखवणार नाहीत एवधी मोठी दुर्घटना घडली आहे. मुआन अग्निशमन केंद्राचे प्रमुख ली जेओंग-ह्योन यांनी विमान अपघाताविषयीची कारणे दिली आहेत. म्हणाले, विमानावर पक्षी धडकणं हे देखील अपघाताचे संभाव्य कारण असू शकतं. पक्ष्याची धडक किती धोकेदायक असते हे आपण जाणून घेऊ.
बर्ड स्ट्राइक काय असतं?
जेव्हा पक्षी विमानावर धडकतात तेव्हा त्या घटनेला बर्ड स्ट्राइक म्हटलं जातं.
अपघात होण्याची शक्यता
विमानाच्या सुरक्षेसाठी हा सर्वात सामान्य परंतु गंभीर धोक्यांपैकी एक आहे. टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी पक्ष्यांची धडक होत असते. प्रत्येक पक्ष्यांची धडक ही जीवघेणी असते असे नाही. परंतु काही प्रकरणांत मोठा अपघात होण्याची शक्यता असते. जेव्हा पक्षी विमानाच्या बॉडीला धडकतात. तेव्हा ही सहसा गंभीर समस्या नसते. पण जर पक्षी विमानाच्या इंजिनमध्ये घुसतात तेव्हा इंजिनचं नुकसान होतं.
विमानाचा वेग नियंत्रणात आणण्यास अडचण
यामुळे विमानाचा वेग नियंत्रणात आणण्यास अडचण निर्माण होते. पंख्याच्या ब्लेडला गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो. अशा परिस्थितीत पायलट सहसा जवळच्या विमानतळावर विमान उतरवण्याचा प्रयत्न करतात.
अमेरिकेत बर्ड स्ट्राइकची मोठी घटना 2009मध्ये घडली होती. न्यूयॉर्कहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानाला पक्ष्यांची धडक झाली. या धडकेत US Airways Flight 1549 चे दोन्ही इंजिन निकामी झाले होते. सुदैवाने विमानातील प्रवासी वाचले होते.