Hole In Delhi-Mumbai Highway: देशातील सर्वात मोठ्या दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावर पडला मोठा खड्डा; कर्मचाऱ्याने ठरवले उंदरांना जबाबदार, कंपनीकडून निलंबित (Watch Video)

आता पावसाळ्याच्या पहिल्या पावसानंतर एक्स्प्रेस वेची अवस्था अशी झाली आहे. पावसाळ्यापूर्वीही अनेक ठिकाणी अशीच स्थिती पाहायला मिळत होती.

Delhi-Mumbai Expressway Caves-In (Photo Credit: X/@aishwaryam99)

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे (Delhi-Mumbai Expressway) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एक्स्प्रेस वेचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये रस्त्यावर खड्डे पडल्याचे दिसत होते. आता पुन्हा एकदा दौसा परिसरात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर जावा;जवळ 10 फुट मोठा खड्डा पडला आहे. या मार्गाने जड वाहने गेल्याने रस्ता एका ठिकाणी पूर्णतः खचून तिथे मोठा खड्डा पडल्याचे दिसत आहे. देशातील सर्वात मोठ्या रस्त्यावर म्हणजेच दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भंडारेज टोलनाक्याजवळ मोठा खड्डा तयार झाला आहे. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन जात नसल्याने मोठा अपघात टळला.

सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या एक्स्प्रेस वेवररस्त्याच्या खराब परिस्थितीमुळे सातत्याने रस्ते अपघात होत आहेत. या ठिकाणी आतापर्यंत सुमारे 125 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाप्रकारे पावसाळ्यात या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याच्या बांधकामाचा पर्दाफाश होत आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याचे चित्र मंगळवारी समोर आले. याची माहिती गस्ती पथकाला मिळताच वाहतूक तात्काळ बंद करून खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावर पडला मोठा खड्डा-

याठिकाणी मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले होते. आता पावसाळ्याच्या पहिल्या पावसानंतर एक्स्प्रेस वेची अवस्था अशी झाली आहे. पावसाळ्यापूर्वीही अनेक ठिकाणी अशीच स्थिती पाहायला मिळत होती. महत्वाचे म्हणजे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचा देखभाल व्यवस्थापक असल्याचा दावा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने याबाबत सांगितले की, महामार्गावरील या मोठ्या खड्ड्याला उंदीर जबाबदार आहेत. कर्मचारी म्हणाला की, उंदीर किंवा एखाद्या लहान प्राण्याने खड्डा खोदला असण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Mumbai Ring Roads: लवकरच मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा! शहराभोवती बांधले जाणार 5 रिंग रोड, जाणून घ्या मार्ग)

हा कर्मचारी केसीसी बिल्डकॉनचा कनिष्ठ कर्मचारी होता. त्याच्या या वक्तव्यानंतर  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कठोर भूमिका घेतली. ‘इंडिया टुडे' मधील एका वृत्तानुसार, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे बांधणाऱ्या केसीसी बिल्डकॉन कंपनीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला लिहिलेल्या पत्रात आपली भूमिका स्पष्ट केली. फर्मने सांगितले की, ही टिप्पणी एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने केली आहे, ज्याला प्रकल्पाची तांत्रिक समज नाही. त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की, कर्मचारी देखभाल व्यवस्थापक नाही आणि त्याच्या टिप्पण्या तांत्रिक समजुतीवर आधारित नाहीत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif