Delhi Hit-and-Run: दिल्लीमध्ये 'हिट अँड रन'; धडकेमुळे कारच्या छतावर आदळलेल्या पिडितासह कारचालकाचा तीन किमी प्रवास, एकाचा मृत्यू (Watch Video)

या घटनेचे एका प्रत्यक्षदर्शीने व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले आहे. प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने आलेल्या काळ्या रंगाची एसयूव्ही स्कूटरला धडकली. धक्कादायक म्हणजे, धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरील एकजण हवेत उडाला आणि कारच्या छतावर जाऊन आदळला.

Delhi Hit-and-Run (Photo Credits: Twitter)

राजधानी दिल्लीमध्ये भीषण हिट-अँड-रन (Hit and Run' in Delhi) प्रकरण घडले आहे. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिल्लीतील (Delhi) उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या उच्च सुरक्षा व्हीआयपी झोनमध्ये घडली. या परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका एसयूव्हीने स्कुटरवरुन प्रवास करणाऱ्या दोघांना धडक दिली. ज्यामुळे स्कुटरवरील एकजण उचलून बाजूला फेकला गेला. तर दुसरा एसयूव्हीच्या छतावर जाऊन आदळला. धक्कादायक म्हणजे या प्रकारानंतर गाडी थांबविण्याऐवजी एसयूव्ही चालकाने छतावर आदळलेल्या पीडितासह तब्बल तीन किलोमीटर वाहन हाकले. पुढे एका चौकात वाहतूक सिग्नलजवळ त्याने कार थांबली आणि छतावरील पीडित व्यक्तीला खाली फेकून वाहनासह पळ काढला. यात छतावरील व्यक्तीचा मृत्यू झाला.

हिट अँड रनची ही घटना कस्तुरबा गांधी मार्ग आणि टॉलस्टॉय मार्ग चौरस्त्यावर घडली. या घटनेचे एका प्रत्यक्षदर्शीने व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले आहे. प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने आलेल्या काळ्या रंगाची एसयूव्ही स्कूटरला धडकली. धक्कादायक म्हणजे, धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरील एकजण हवेत उडाला आणि कारच्या छतावर जाऊन आदळला. छतावरील व्यक्तीसह एसयूव्ही चालकाने तीन किलोमीटर प्रवास केला. छतावर आदळलेल्या व्यक्तीचे नाव दिपांशू शर्मा असल्याचे समजते. (हेही वाचा, Thane Auto Rickshaw Accident: ठाणे घोडबंदर रोड वर रिक्षा डिव्हायडरला आदळून पेटली; महिला प्रवासीचा मृत्यू)

मोहम्मद बिलाल नावाच्या प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले की, त्याने आपल्या स्कुटीने कारचा पाटलाग केला आणि व्हिडिओ बनविला. तो पाठिमागून ओरडत राहिला, हॉर्न देत राहिला. पण कारचालकाने कार थांबवली नाही.

ट्विट

दरम्यान, व्हिडिओमध्येही पाहायला मिळते की, एक व्यक्ती कारच्या छतावर पडलेली दिसते आहे. दरम्यान, आरोपीने 3 किलोमीटर प्रवास केल्यावर दिल्ली गेट येथे, कारच्या छतावरील व्यक्तीला एसयूव्हीवरुन फेकून दिले आणि घटनास्थळावरुन पळ काढला.