Heatwaves: भारताला उष्णतेचा तडाखा; पाठिमागील 50 वर्षात 17,000 नागरिकांचा मृत्यू
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे (Union Ministry of Earth Sciences) सचिव एम. राजीवन यांच्या निरिक्षणाखाली कमलजीत रे, एस.एस. रे, आर.के. गिरी आणि ए.पी. डिमरी यांनी हा शोधनिबंध तयार केला आहे. कमलजित रे हे या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक आहे.
भारताला पाठिमागील जवळपास 50 वर्षांमध्ये वाढत्या उष्णतेच्या लाटांचा (Heatwaves) मोठा फटका बसल्याचे एका शोधनिबंधातून पुढे आले आहे. भारतात सन 1971 ते 2019 या कालावधीत सुमारे 17,000 जणांचा मृत्यू झाल आहे. भारतीय हवामान विभागाच्या तज्ज्ञांच्या पथकाने केलेल्या अभ्यासात ही माहिती पुढे आली आहे. शोधनिबंधात म्हटले आहे की, हवामानातील अत्यांतिक बदलामुळे (EWE) 706 नागरिकांचे प्राण गेले आहेत. प्रामुख्याने उष्माघाताने होणार्या सर्वाधिक मृत्यूची नोंद आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये झाली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे (Union Ministry of Earth Sciences) सचिव एम. राजीवन यांच्या निरिक्षणाखाली कमलजीत रे, एस.एस. रे, आर.के. गिरी आणि ए.पी. डिमरी यांनी हा शोधनिबंध तयार केला आहे. कमलजित रे हे या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक आहे.
अभ्यसकांनी अभ्यासांती प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, हवामान बजल आणि उष्णतेमुळे आतापर्यंत 141,308 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. ही आकडेवारी 1971 पासून पुढची आहे. अभ्यासात असेही पुढे आले की, 17,362 नागरिकांना केवळ उष्माघात किंवा उष्णतेचा तत्सम त्रास झाल्याने मृत्यू झाला आहे. हे प्रमाण पाठिमागील 50 वर्षांमध्ये EWE मुळे झालेल्या एकूण मृत्यूच्या 12% आहे. (हेही वाचा, Summer Health Tips: उन्हाळ्यात कोशिंबीर खाण्याचे 'हे' आश्चर्यजनक फायदे तुम्हाला माहित आहे का?)
उत्तर गोलार्धातील काही भागात भविष्यात उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा शोधनिबंध महत्त्वाचा ठरतो. हा शोधनिबंध सांगतो की, भारतात, उत्तरेकडील मैदानावर तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले आहे. तसेच, डोंगराळ प्रदेशातही उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवला आहे.
उष्णतेची लाट घोषीत करण्यासाठी विविध मापदंड आहेत. मैदानी भाग आणि डोंगराळ प्रदेशात, हवामान जर 40 अंश सेल्सीअस डिग्री आणि पाणी जर 30 अंश सेल्सीअस डिग्री तापमानाला तापले असेल तर उष्णतेची लाट घोषीत केली जाते. तापमान जेव्हा अनुक्रमे 40 आणि 30 अंश सेल्सीअस पेक्षाही वाढले जाते. तेव्हा नागरिकांना अधिक काळजी घ्यायला सांगितले जाते.