Haryana Shocker: नवजात अर्भकाला अणकुचीदार कुंपणावर फेकेले; हरियाणा येथील क्रूर घटना

इमारतीच्या फाटकाला असलेल्या अणकुचीदार कुंपणावर नवजात अर्भकास फेकल्याची धक्कादायक घटना हरियाणा (Haryana Shocker) राज्यातील फरीदाबाद (Faridabad) येथील अजरोंडा या गावात घडली आहे.

Crime | (File image)

इमारतीच्या फाटकाला असलेल्या अणकुचीदार कुंपणावर नवजात अर्भकास फेकल्याची धक्कादायक घटना हरियाणा (Haryana Shocker) राज्यातील फरीदाबाद (Faridabad) येथील अजरोंडा या गावात घडली आहे. निर्जीव अर्भकाचा मृतदेह कुंपणावरील सळीला लटकताना आठळून आला आणि गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान हे अर्भक कोणाचे आहे किंवा कोणी हा प्रकार केला याबाबत अद्याप माहिती पुढे आली नाही. गावकऱ्यांनी फरीदाबाद पोलिसांना (Faridabad Police) माहिती दिली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनास पाठवला आहे. तसेच, पुढील तपास सुरु केला आहे.

अर्भक रक्तबंबाळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील अजरोंडा गावात राहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने नवजात अर्भक फेकून दिले. जे इमारतीच्या कुंपणावरील अनकुचीदार लोखंडी शिगेवर आढळून आले. लोखंडी सळई पोटात घुसल्याने अर्भक रक्तबंबाळ झाले होते. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. इतक्या बिबत्स आणि क्रूर पद्धतीने फेकलेले अर्भक पाहून गावकऱ्यांना धक्का बसला. परिसरात घबराटीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नवजात अर्भकाचा मृतदेह लोखंडी जाळीतून काळजीपूर्वक काढला आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम तपासणीसाठी फरिदाबाद येथील बादशाह खान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. (हेही वाचा, Madhya Pradesh: दीड महिन्यांच्या बाळाला लोखंडी सळीने डागले, अंगावर 40 हून अधिक चटके; न्यूमोनिया आजारावर अघोरी उपचार)

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी पुढे सांगितले की, अर्भकाची हत्या करुन मृतदेह कुंपणावर लटकविण्यात आला की, जीवंत अर्बक कुंपणावर लटकवल्याने त्याचा मृत्यू झाला याबाबत शवविच्छेदन अहवाल येताच माहिती मिळू शकेल. या प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. परिसरात सीसीटीव्ही आहे का आणि असल्यास त्यातून काही धागेदोरे मिळतात का याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.

दरम्यान, सामाजिक विषयांच अभ्यासक सांगतात की, अर्भक फेकून देण्याच्या घटना घडण्यास अनेक कारणे असतात. ज्यामध्ये नको असलेली गर्भधारणा, अनैतिक संबंध, अल्पवयीनांचे लैंगिक संबंध, बलात्कार, कमकुवत आर्थिक स्थिती, असुरक्षीत लैंगिक संबंध, नको असलेल्या जोडीदाराकडून झालेली गर्भधारणा, क्रूर आणि खुनशी वृत्ती, घरगुती वाद, हिंसाचार, पूर्ववैमनश्य, जाडीदार अथवा मानसिक विकलांगता, जबाबदारी घेण्याचा आत्मविश्वास नसणे, संशय, भीती, आरोग्याच्या समस्या, बदला घेण्याची वृत्ती, सूड, कायदेशीर कारवाईची भीती, न्यायालयीन खटले यांसारख्या एक ना अनेक कारणाचा अर्भक नको असण्यामध्ये समावेश असतो. दरम्यान, कारण काहीही असले तरी, नवजात अर्भक अथवा बाळ बेवारस फेकून देणे कायद्याने गुन्हा आहे. अशी नवजात अर्भके, बाळे आढळून आल्यास आणि ती जीवंत असल्यास पोलीस ती ताब्यात घेतात आणि कायदेशीर प्रक्रियेने ती सुरक्षीत ठिकाणी पाठवतात. त्यानंतर अशा बाळांच्या नैसर्गिक पालकांचाही शोध घेतला जातो.