Gyanvapi Case Update: ज्ञानवापी प्रकरणात मुस्लीम पक्षकारांना धक्का, अलाहाबाद हायकोर्टानं याचिका फेटाळली
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पाच याचिका फेटाळल्या आहेत. हा मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का मानला जात आहे. वाराणसी
ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील (Gyanvapi Masjid Case) प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं (Allahabad High Court) आज एक मोठा निर्णय सुनावला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1991 च्या खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने पाच याचिका फेटाळल्या आहेत. हा मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का मानला जात आहे. वाराणसी कोर्टातल्या (Varanasi Court) दाव्याची सुनावणी 6 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मशिदीचं सर्वेक्षण (Survey of Mosque) सुरू ठेवण्यासही कोर्टानं अनुमतीही दिली आहे. (हेही वाचा - Gyanvapi Case Update: ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, मूळ याचिकेसह 4 याचिकांवर आज होणार होती सुनावणी)
पाहा पोस्ट -
दरम्यान, मुस्लिम पक्षकारांच्या वतीनं हिंदू पक्षकारांच्या 1991 च्या खटल्याला आव्हान देणार्या याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या, ज्या न्यायालयानं फेटाळल्या आहेत. अंजुमन इंतेजामिया कमिटी आणि यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डानं 1991 मध्ये वाराणसी कोर्टात दाखल केलेला मूळ खटला कायम ठेवण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयाच्या जागेच्या सर्वेक्षणाच्या आदेशाला तीन याचिकांमध्ये आव्हान देण्यात आलं होतं.