Gwalior Shocker: शेजारच्या पुरुषाशी बोलण्यापासून पत्नीला रोखले; संतापलेल्या महिलेने रात्री पतीच्या गुप्तांगावर ओतले उकळलेले तेल

यानंतर आरोपी पत्नीने तेथून पळ काढला. वेदनेने त्रस्त झालेल्या सुनीलने मदतीसाठी आरडाओरडा केला, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून जखमी सुनीलला उपचारासाठी दाखल केले.

प्रातिनिधिक प्रतिमा

ग्वाल्हेरमध्ये (Gwalior) पत्नीला शेजारच्या तरुणाशी मोबाईलवर बोलण्यापासून रोखणे पतीला खूप महागात पडले आहे. पत्नी या तरुणाशी फोनवर बोलता असताना पतीने तिला अडवले मात्र पत्नीने त्याचे ऐकले नाही. यामुळे संतापलेल्या पतीने तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. या गोष्टीमुळे संतापलेल्या पत्नीने पती रात्री झोपलेला असताना त्याच्या गुप्तांगावर उकळलेले तेल ओतले. कंपू पोलीस स्टेशन हद्दीतील माधवी नगर येथे ही घटना घडली.

तेलामुळे भाजलेल्या पीडित पतीने जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी जखमी पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता पत्नी फरार असल्याची माहिती मिळत आहे.

माहितीनुसार कंपू पोलीस स्टेशन हद्दीतील माधवी नगर येथे राहणारा 32 वर्षीय सुनील धाकड खाजगी नोकरी करतो. तो आपली पत्नी भावना हिच्यासोबत राहतो. काही दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सुनीलकडे तक्रार केली होती की, तो बाहेर गेल्यानंतर त्याची पत्नी भावना ही तिच्या पतीशी बोलते. महिलेने असेही सांगितले की, आपल्या पतीशी न बोलण्याबाबत तिने अनेकदा भावनाला समजावले होते मात्र तिच्यावर काही फरक पडला नाही.

एके दिवशी पती सुनील घरी आला असता भावना या शेजारच्या पुरुषाशी मोबाईलवर बोलत होती. त्याने अनेकता भावनाला या पुरुषाशी बोलण्यास मनाई केली मात्र तिने यासाठी नकार दिला. तिने मोबाईलवरील आपले बोलणे थांबवले नाही त्यामुळे संतापलेल्या सुनीलने भावनाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यावेळी रागाच्या भरात भावना निघून गेली आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास नवरा झोपला असताना तिने किचनमध्ये तेल उकळले आणि त्याच्या गुप्तांगावर ओतले. (हेही वाचा: Gujarat Shocker: गुजरात हायकोर्टात सुनावणीदरम्यान 4 जणांनी न्यायाधीशांसमोर प्यायले फिनाईल; केला आत्महत्येचा प्रयत्न)

तेल इतके गरम होते की त्यामुळे सुनीलचे गुप्तांग मोठ्या प्रमाणावर भाजले. यानंतर आरोपी पत्नीने तेथून पळ काढला. वेदनेने त्रस्त झालेल्या सुनीलने मदतीसाठी आरडाओरडा केला, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून जखमी सुनीलला उपचारासाठी दाखल केले व पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुसरीकडे, पतीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे.