Gun Factory At Home: नवं स्टार्टअप सांगत घरीच थाटला पिस्तुल बनवण्याचा कारखाना, पोलिसांकडून आरोपींचा पर्दाफाश

संबंधीत बाबीत दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. नौशाद आणि करीमुद्दीन अशी या आरोपींची नावे आहेत.

Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

हल्ली नोकऱ्या मिळण कठीण झालं आहे. आजच्या तरुण पिठीवर बेरोजगारीचं (Unemployment) मोठं संकट आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्या देशात दिवसेनदिवस वाढतचं आहे. त्यामुळे हल्ली तरुण स्वतचा व्यवसाय थाटतांना दिसत आहे. तरुणांचा कल सध्या स्टार्टअपच्या दिशेने आहे. किंबहुना ओयो (OYO), झोमॅटो (Zomato) सारख्या स्टारटपला चांगली पसंती मिळली असुन आयपीओमध्ये या कंपनीचा बोलबाला आहे. कुठलीही गोष्ट नव्याने करायची असली, नव्याने शिकायची असल्यास अगदी चिमुकल्यांपासून तर जेष्ठांपर्यत वापर करतात ते मोबाईलचा. गुगल (Google) बाबा की जय म्हणत सगळ्या गोष्टी गुगलवर बघितल्या जातात किंवा कुठलीही गोष्ट कशी करतात, बनवतात हे बघण्यासाठी यूट्यबसारखं (YouTube) विनामुल्य अप आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही त्यावरती हवं ते बघु शकता. असचं पठ्याने पिस्तुली कशा बनवायच्या ह्याचे व्हिडीओ युट्युबवर बघितले. एवढचं नाही तर ते बनवण्यासाठी नेमक काय सामन लागतं ही माहिती देखील इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली.

 

घरीचं स्टार्टअप (Start Up) म्हणजे घरच्या घरी पिस्तुलिचा कारखाना सुरु केला. आवश्यक तो कच्चा माल, पिस्तुल बनवण्याचं सामान आणल्या गेलं आणि काय तर व्यवसायास शुभारंभ (Inauguration) झाला. पण जेव्हा मालाच्या विक्रीची वेळ आली तेव्हा हल्लेखोरांना संपर्क करण्यात आला. तोच पोलिसांना सुगावा लागला आणि कारखान्यावर छापेमारी केली. संबंधीत बाबीत दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.  नौशाद आणि करीमुद्दीन अशी या आरोपींची नावे आहेत. (हे ही वाचा:- Crime: 27 दिवसांच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला जन्मठेपेची हत्या)

 

हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात घडला आहे. मेरठ पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. तसेच या गुन्ह्याची सायबर खात्यात देखील नोंद केली आहे. कारण आरोपींनी इंटरनेटच्या साहाय्याने हा कारखाना उभारल्याची कबूली दिली आहे. लवकर पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी हा सगळा घाट घातल्याचं तरुणांनी सांगितल आहे. तसेच या प्रकारची माहिती उपलब्ध असलेल्या इंटरनेटवरील वेबसाईटसह व्हिडीओवर देखील कारवाई करणार असल्याची माहिती मेरठ  पोलिसांनी दिली आहे.