चमत्कार: Cyclone Tauktae मध्ये एकुलता डोळा गमावलेल्या गुजरातच्या वृद्ध शेतकर्याची दृष्टी जटील शस्त्रक्रियेनंतर परतली
अशा शस्त्रक्रिया क्वचित होतात असे नाही पण त्या कठीण आहेत.
मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामध्ये गुजरातच्या गीर- सोमनाथ मधील Nanu Savaliya या वृद्धाने आपला एक डोळा गमावला होता. दरम्यान त्यांचा दुसरा डोळा लहानपणीच गेला होता. पण एक जटील शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी चक्रीवादळात गमावलेला डोळा आता पुन्हा काम करण्यास सुरूवात झाली आहे.
Nanu Savaliya आपल्या शेतात काम करताना तैक्ते वादळात जोराच्या वार्याने एक मेटॅलिक तुकडा आला तो त्यांच्या एकूलत्या काम करणार्या डोळ्याला इजा करून गेला. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सारी आशाच सोडली होती पण अहमदाबाद मध्ये Netralaya Hospital ने त्यांच्यावर एक कठीण शस्त्रक्रिया करून दृष्टी परत आणली. 26 जुलै पासून आता Nanu Savaliya पुन्हा एका डोळ्याने पाहू शकत आहेत.
नेत्रालय हॉस्पिटलचे Dr Parth Rana यांनी TOI ला दिलेल्या माहितीनुसार, Savaliya यांच्या cornea ला गंभीर दुखापत होऊन तो फाटला होता, सोबत vitreous hemorrhage आणि traumatic cataract होता. ज्यावेळी Savaliya यांची दृष्टी परत आली तेव्हा त्यांना ही गोष्ट एका चमत्काराप्रमाणेच वाटली.
डॉक्टरांनी 3 डी तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केली यामध्ये डोळ्यात त्यांना 100 पट मॅग्निफाईड गोष्टी दिसल्याने किचकट शस्त्रक्रिया करणं सुकर झाली. अशा शस्त्रक्रिया क्वचित होतात असे नाही पण त्या कठीण आहेत. 3 डी तंत्रज्ञानाने एका वेळी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.